Goa Election: गोव्यात राजकीय पक्षांचा 'डिजिटल' प्रचार सुरू

गोव्यातील (Goa) राजकीय पक्ष डिजिटल मोहिमेवर पूर्वीपेक्षा अधिक अवलंबून आहेत.
Digital Campaign
Digital Campaign Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आगामी काळात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने (EC) कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारीपर्यंत निवडणूक रॅलींवर बंदी घातली आहे. परिणामी राजकीय पक्षांना प्रचाराची रणनीती बदलावी लागत आहे. अनेक पक्ष 'घरोघरी जाऊन प्रचार' व 'डिजिटल' प्रचाराच्या माध्यमातून मंतदारांपर्यंत पोचत आहेत. (Digital Campaign Goa Assembly Election Update)

Digital Campaign
'भाजपने आता मॅनिफेस्टो नाही तर 'मनिफेस्टो' जाहीर करायला पाहिजे'

गोव्यातील (Goa) राजकीय पक्ष डिजिटल मोहिमेवर पूर्वीपेक्षा अधिक अवलंबून आहेत. व्हर्च्युअल रॅली आणि सोशल मीडिया (Social Media) व्हिडिओंपासून ते शेकडो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स आणि मीम्सपर्यंत, सर्व पर्याय वापरले जात आहेत. 15 जानेवारी रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणूक आयोग पुढील निर्णय घईल. तिसर्‍या कोविड-19 लाटेचा उच्चांक 14 फेब्रुवारी रोजी होणार्‍या निवडणुकांशी जुळून येण्याची अपेक्षा आहे.

राजकीय पक्षांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी लिंक्स तयार केल्या आहेत. या ग्रुपद्वारे निवडणूक प्रचार केला जाईल. यामध्ये जाहीरनामा, पोस्टर्स, निवडणूक आश्वासनांचे व्हिडिओचा समावेश असेल.

भाजपने (BJP) आपली सोशल मीडिया टीम मजबूत केली आहे आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग, व्हर्च्युअल मीटिंग आणि मीडिया मोहिमांसाठी आधीच एक रणनीती तयार केली आहे. तृणमूल कॉंग्रेसची निवडणूक रणनीती प्रशांत किशोर यांची इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी (I-PAC) ठरवत आहे.

“डोअर-टू-डोअर भेटी हा पारंपारिक पद्धतीने लोकांशी संपर्क साधण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, मात्र आम्ही ईतर पर्याय ही वापरत आहोत. या वीकेंडपासून आम्ही फेसबुक लाईव्ह सेशन्स करणार आहोत,” असे आपचे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी सांगितले.

Digital Campaign
Goa Election: भाजपची पहिली उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार?

“आम्ही विविध पर्याय शोधत आहोत. आम्ही व्हर्च्युअल रॅली आणि सभा घेणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे,” असे प्रदेश काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस आणि निवडणुकीसाठी धोरणात्मक व्यवस्थापनाचे प्रभारी सुनील कवठणकर म्हणाले.

I-PAC ची एक डिजिटल टीम सप्टेंबरपासून गोव्यात तळ ठोकून आहे. टीममध्ये 30 ते 50 सदस्य आहेत जे डिजिटल माध्यमातून तृणमूलचा प्रचार करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com