Goa Election: भाजपची पहिली उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार?

भाजपतर्फे 80 संभाव्य उमेदवारांची नावे केंद्रीय संसदीय कमिटीकडे पाठवण्यात आली आहे.
BJP Meeting
BJP Meeting Dainik Gomantak

पणजी: विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता असून ती नामुष्की टाळणे हेच भाजपसमोर मोठे आव्हान असल्याचे सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. यासाठी काल झालेल्या कोअर कमिटी आणि निवडणूक व्यवस्थापन कमिटीच्या बैठकीमध्ये या संभाव्य गोष्टींचा विचार करून उमेदवारांची नावे केंद्रीय संसदीय कमिटीला सादर करण्यात आली. (BJP Goa Assembly Election Latest News)

BJP Meeting
Goa Weather Updates: राज्यात गारठ्यासोबत रविवारपर्यंत धुकेही पडणार

भाजपतर्फे 80 संभाव्य उमेदवारांची नावे केंद्रीय संसदीय कमिटीकडे पाठवण्यात आली असून यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant), विश्वजीत राणे, बाबूश मोन्सेरात, उत्पल पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद मांद्रेकर, फ्रान्सिस सिल्वेरा, विल्फ्रेड डिसा, क्लाफासियो डायस यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय इतर पक्षांतून भाजपमध्ये (BJP) आलेल्या आमदार आणि नेत्यांचा या यादीत समावेश आहे. केंद्रीय संसदीय कमिटी यामधून भाजपच्या पहिल्या उमेदवारांची यादी 16 जानेवारीला जाहीर करण्याची शक्यता भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केली.

पणजीत काल भाजपची कोअर कमिटी आणि निवडणूक व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), सी.टी. रवी, दर्शना जरदोश, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, निवडणूक व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, संघटनमंत्री सतीश धोंड, संजीव देसाई, रमेश तवडकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. या निवडणुकीत विधानसभेच्या 38 जागा लढविणे निश्चित झाले असून अन्य जागांवर भाजप समर्थक उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.

BJP Meeting
भाजपच्या 'त्या' उमेदवारावर उत्पल पर्रीकरांचा हल्लाबोल..

यांचाही समावेश

मगो पक्षातून आलेले प्रेमेन्द्र शेट, प्रवीण आर्लेकर, गोवा फॉरवर्डमधून आलेले जयेश साळगावकर, माजी अपक्ष आमदार रोहन खंवटे, गोविंद गावडे यांंचाही संभाव्य उमेदवार यादीत समावेश आहे.

रणनीतीवर खल

या संयुक्त बैठकीमध्ये भाजप प्रचाराच्या रणनीतीसंदर्भातही चर्चा झाली. कोविडच्या कारणास्तव प्रचार यंत्रणेवर मर्यादा आणि निर्बंध आल्याने संभाव्य प्रचार यंत्रणेचा वापर वाढवणे, बंडखोरी टाळणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

BJP Meeting
दामोदर मावझो यांनी दुसरे ज्ञानपीठकार निलमणी फुकान यांची घेतली भेट

आज भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. याशिवाय संभाव्य उमेदवारांच्या संदर्भातही चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयत्न असून केंद्रीय संसदीय समिती याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com