Goa Assembly Election: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग

गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपने नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज 20 सप्टेंबर रोजी गोव्यात दाखल झाले आहेत.
गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपने नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज दाबोळी विमानतळावर आगमन झाले.यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, मंत्री दिपक पावसकर व इतर.
गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपने नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज दाबोळी विमानतळावर आगमन झाले.यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, मंत्री दिपक पावसकर व इतर.Dainik Goamantak
Published on
Updated on

Goa: आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली असून भाजप (BJP) आणि काँग्रेसचे (Congress) निवडणूक निरीक्षक गोव्यात दाखल झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान, राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपने नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आज 20 सप्टेंबर रोजी गोव्यात दाखल झाले आहेत.

गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपने नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज दाबोळी विमानतळावर आगमन झाले.यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, मंत्री दिपक पावसकर व इतर.
Goa: भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे आज गोव्यात आगमन झाले

आज सकाळी 10.30 वाजता दाबोळी विमानतळावर आगमन झाले.यावेळी त्यांचे नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी स्वागत केले.तसेच संघटन मंत्री सतिश धोंड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पावसकर उपस्थित होते.विमानतळावरुन बाहेर येताच त्यांनी गाडीत बसून पणजीला रवाना झाले.

सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक, प्रभारी पुढील चार दिवसांत गोव्यात असणार आहे. गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपने नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 20 सप्टेंबर रोजी गोव्यात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् 18 रोजी तिसऱ्यांदा गोव्यात आले.

त्यांच्यासोबत प्रभारी दिनेश रावही तीन दिवसांसाठी गोवा दौऱ्यावर आहेत.प्रदेश काँग्रेसमध्ये या घडामोडी घडत असताना भाजपमध्ये मात्र काहीअंशी शांतता पसरली होती. तोच गोव्याशेजारील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते आणि बिहार निवडणुकीत प्रभारी म्हणून भाजपला यश मिळवून दिलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भाजपने गोव्याच्या प्रभारीपदी नेमणूक करून काँग्रेसवर मात करण्याचा प्रयत्न केला. नियुक्तीनंतर फडणवीस 20रोजी प्रथमच गोव्यात आले आहेत. प्रदेश भाजपच्या कोअर समितीची बैठक घेऊन ते निवडणुकीची पुढील रणनीती आखणार आहेत. निवडणूक जवळ येत असताना भाजपमधील अंतर्गत कलह वाढत चालला आहे. काही मंत्री पक्षावर नाराज असून, पुढील निवडणूक ते इतर पक्षांच्या उमेदवारीवर लढवण्याचा विचार करत आहेत. काही विद्यमान आमदारांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांमुळे अनेक भाजप निष्ठावंतांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपने नुकतीच नेमणूक केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज दाबोळी विमानतळावर आगमन झाले.यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, मंत्री दिपक पावसकर व इतर.
Goa: पर्यटन व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी काणकोण पालिकेची एक खिडकी योजना

पुढील काळात या घडामोडी घडत असताना पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना एकत्र आणून निवडणुकीला सामोरे जाण्याची मोठी कसरत फडणवीस यांना प्रभारी म्हणून करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांचा गोव्यातील मुक्कामही वाढण्याची शक्यता आहे.

प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे पुन्हा मतदार संघ दौरा करणार आहे. निवडणुकीपर्यंत सर्वच मतदारसंघांतील भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी दौऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com