मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा कोरगाव येथून प्रचाराचा शुभारंभ

कार्यकर्त्यांचे प्रवीण आर्लेकर यांना निवडून देण्याचे जनतेला आवाहन
Goa Election 2022: मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा प्रचाराचा शुभारंभ
Goa Election 2022: मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा प्रचाराचा शुभारंभDainik Gomantak

Goa Election 2022: विधानसभा निवडणूकीला (Goa Assembly Election 2022) जमतेम चार महिने शिल्लक असून पेडणे मतदारासंघातून मगो पक्षाच्या वातीने प्रवीण आर्लेकर (MGP Leader Pravin Arlekar) यांनी आपल्या प्राचाराचा शुभारंभ कोरगाव (Korgaon) येथून श्री देव कमळेश्वर , श्री देवी भुमिका व देव द्वारपाल यांना श्रीफळ ठेवून केला. यावेळी शेकडे कार्यकर्ते उपस्थित होते. मगोचे चिन्ह आसलेले शेले गळ्यात घालून तसेच टोप्या घालून उपस्थित मगो कार्यकर्त्यांनी "प्रवीण आर्लेकर तुम आगे बढे हम तुमारे साथ है" अशा घोषणा देत देऊळवाडा येथील तसेच कोरगाव परिसार मगोमय झाला.

Goa Election 2022: मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा प्रचाराचा शुभारंभ
गोवा पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत मोफत 'नेत्र चिकित्सा' शिबिर

यावेळी प्रवीण आर्लेकर यांच्या सोबत त्यांची पत्नी पल्लवी , माजी आमदार परशुराम कोटकर, मगो कार्यकारिणी सदस्य सुदिप कोरगावकर, माजी खजिनदार आपा तेली, प्रवक्ते उमेश तळवणेकर, उगवे - तांबोसे - मोप पंचायतीच्या सरपंच सरस्वती नाईक , उपसरपंच सुबोध महाले, पंच मधुसुदन सामंत, पंच दीपक तांबोस्कर, पंच आश्विनी परब, पंच सुवर्णा केणी, माजी धारगळ जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, माजी पंच आवेलिनो राॕड्रिग्स, वजरीच्या माजी सरपंच व विद्यमान पंच संगीता गावकर, इब्रामपूरचे माजी सरपंच अशोक धावस्कर, देवानंद गावडे, महेश परब, देविदास नागवेकर, आनंद तळवणेकर , संतोष नागवेकर , जयेश पालयेकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Goa Election 2022: मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा प्रचाराचा शुभारंभ
गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नझिर खान

प्रवीण आर्लेकर यांचे शक्ती प्रदर्शन

पेडणे मतदारसंघाचे नेते तथा समाजसेवक प्रवीण आर्लेकर हे गेली दोन वर्षे विविध उपक्रम आणि कार्यक्रम करुन पेडणे मतदारसांघात कार्य करत आहे. प्रावीण आर्लेकर यांचे कार्याचा धडका चालू असून विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवारानी प्रवीण आर्लेकर यांचा धसका घेतला आहे.

खोटी आश्वासने देणार नाही: प्रावीण आर्लेकर

पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावाकर यांच्या सारखी आपण खोटी आश्वासने देऊन पेडणेकरांची दिशाभूल करणार नाही.तो आता नोकऱ्या देणार म्हणून खोटी आश्वासने पेडणेकरांना देणार.गेली अनेक वर्षे ते नोकऱ्या देऊ शकले नाही.आता विमानताळ प्रकल्पावर नोकऱ्या देणार असे तो सांगतअसून त्याठिकाणी नोकऱ्या मिळविण्यासाठी ट्रेनिंग देण्याची आवश्यकता होती असे प्रवीण आर्लेकर म्हाणाले. त्यासाठी ट्रेनिंग स्कूल त्यांनी केले नाही.आपण आमदार म्हणून निवडून आल्यास पहिल्यांदा ट्रेनिंग स्कूल सुरू करुन ट्रेनिंग देणार आणि मग त्यांना नोकऱ्या देणार.

पेडणे मतादारसंघात पाण्याची गंभीर समस्या असून तो प्रश्न आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावकर सोडवू शकले नाहीत.आपण निवडून आल्यास किमान १२ तास पाणी पुरवठा देणार असे आश्वासन यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी केले.

Goa Election 2022: मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा प्रचाराचा शुभारंभ
भाजपचा लाठीचार्ज कॉँग्रेससला रोखू शकत नाही: काँग्रेस

बाबूने जी आश्वासाने पेडणेकरांना दिली ती पाळली नाहीः परशुराम कोटकर

यावेळी मगोचे माजी आमदार परशुराम कोटकर म्हणाले बाबूने जी निवडणुकीवेळी आश्वासने दिली होती ती पाळली नाही.त्यानी दहावी नपास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी देण्यासाठी विधानसभेत कायदा करणार असे आश्वासन दिले होते.तसेच त्यांनी मगो पक्षाचा घात करुन ते स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेले. आता येत्या निवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार प्रावीण आर्लेकर यांना मतदान करुन विधानसभेत पाठवूया असे आवाहन केले.

बाबू आजगावकर यांनी पेडणेकरांवर अत्याचार केलेः उमेश तळवणेकर

बाबू आजगावकर यांना पेडणेतील जनतेने २० वर्षे आमदार म्हणून निवडून दिले. माञ विकासाच्या बाता मारणा-या बाबू आजगावकर यांनी पेडणेकरांवरच अत्याचार केले. आता त्यांना परत पेडणेकरांनी संधी देऊ नये. पेडणे मतदारसंघातील जनतेची तळमळ असलेल्या प्रवीण आर्लेकर यांना पेडणेतील जृनतेने निवाडून देऊन बाबू आजगावाकर यांना मडगावला पाठवावे असे सांगून आता अनेकजण येणार माञ त्यांच्या भुलथापाना बळी पडू नका असे आवाहन प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी केले.

बाबूकडून पैसे घ्या आणि प्रवीणला मते द्याः तुकाराम हरमलकर

यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर म्हणाले, मागील निवाडणुकीवेळी बाबू आजगावकर यांचे स्लोगन देऊन आवाहान करत होते भाजपकडून पैसे घ्या आणि मगोला मते द्या.आता आमचे स्लोगन असे आहे की बाबूकडून पैसे घ्या आणि मगोचे प्रवीण आर्लेकर यांना मते द्या.कारण आता अनेकजण आश्वासाने देणार , पैसे देणार , बाबूने मोपा विमानतळ प्रकल्प आणि अन्य प्राकल्पातून खूप पैसा कमविला तो त्यांच्याकडून घ्या आणि मते माञ मगोला द्या असे आवाहन करत. प्रवीण आर्लेकर हे आता धारगळ येथे घर बांधून पेडणे मतदारसंघात स्थायिक झाले आहे. आता त्यांच्या मागे पेडणेतील जनतेने राहून त्यांना निवडून आणूया असे आवाहन केले.

Goa Election 2022: मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा प्रचाराचा शुभारंभ
Mamata Banerjee 28 ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर!

प्रवीण आर्लेकर यांना पेडणेतील जनतेची जाणीव आहेः सुबोध महाले

यावेळी बोलताना उपसरपंच सुबोध महाले म्हणाले की गेली दोन वर्षे प्रवीण आर्लेकर हे लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतः च्या खिशातून पैसे खर्च करत आहे. शिक्षण , क्रीडा , सामाजिक संस्था , सांस्कृतिक मंडळ आदीना आता पर्यतत्यांनी मदतीचा हात दिला.अपंग सेच आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना मदत ते करत आहे.अशा व्यक्तीला आम्ही आमचा आमदार करुया असे आवाहन केले.

यावेळी देवानंद गावडे, सुदि कोरगावकर , संगीता गावकर आदीने भाषणे करुन प्रवीण आर्लेकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com