गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नझिर खान

केंद्रीय समितीचे सरचिटणीस के.सी.वी. वेणुगोपाल यांनी एका पत्रकाद्वारे केले जाहीर
नझीर खान यांचे अभिनंदन करताना अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख ईमरान प्रतापगडी
नझीर खान यांचे अभिनंदन करताना अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख ईमरान प्रतापगडीDainik Gomantak

Goa: अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे (Congress Party) गोवा प्रदेश काँग्रेस (GPCC) अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी वास्कोतील उद्योजक तथा समाजसेवक नझिर खान (GPCC Minority President Nazir Khan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय समितीचे सरचिटणीस तथा खासदार के.सी.वी. वेणुगोपाल यांनी नझिर खान यांना गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष केल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केले.

नझीर खान यांचे अभिनंदन करताना अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख ईमरान प्रतापगडी
भाजपचा लाठीचार्ज कॉँग्रेससला रोखू शकत नाही: काँग्रेस

वास्को येथील प्रसिद्ध उद्योजक नजीर खान यांनी एक वर्षापूर्वी गोवा प्रदेश काँग्रेस समितीत गोवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा देऊन प्रवेश केला होता. गुरुवार (दि.२१) अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी . वी. वेणुगोपाल यांनी नझिर खान यांची गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले आहे. यामुळे वास्को बरोबर संपूर्ण मुरगाव तालुक्यातून नजीर खान यांचे अभिनंदन होत आहे. गोवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अल्पसंख्यांक विभाग नेतृत्व सांभाळताना नझिर खान याने बायणा येथील एमपीटी मैदानावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे होत असलेल्या गैर कारभारा विरोधात जनहित याचिका दाखल करून त्यांना न्यायालयात खेचले होते. तसेच त्याने विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला होता. मुस्लिम कुटुंबातील असून सुद्धा सर्व धर्माचे आदर करणारा नझिर खान यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे.

नझीर खान यांचे अभिनंदन करताना अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख ईमरान प्रतापगडी
Mamata Banerjee 28 ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर!

गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी निवड होताना नझिर खान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले.तसेच गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील अल्पसंख्यांकांना न्याय देताना इतर धर्मांना सुद्धा मान राखणार असल्याची माहिती खान यांनी दिली. गोव्यातून हाज यात्रेसाठी जाणाऱ्या बांधवाना चांगली सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार. मुरगाव तालुक्यात हाज यात्रेकरूसाठी हाच घर बांधण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न करणार असल्याची माहिती खान यांनी दिली. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने युतीसाठी प्रयत्न करण्याची पूर्ण जबाबदारी काँग्रेस पदाधिकार्‍यांची आहे.

माझे वैयक्तिक मत काँग्रेस पक्षाने युतीसाठी प्रयत्न केल्यास चांगले होणार अशी माहिती नजीर खान यांनी दिली. वास्कोतून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विचारले असता नझिर खान यांनी सांगितले की जर पक्षाने जबाबदारी दिल्यास मी ती स्वीकारणार असल्याचे सांगितले. राजकीय क्षेत्रात मला बऱ्यापैकी अनुभव असून काँग्रेस पक्षाचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार असून इतर पक्षांनी सुद्धा यात आपला सहभाग दाखवावा. तेव्हाच यूतीचा प्रश्न सोडवीता येईल.अशी माहिती शेवटी नवनिर्वाचित गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com