Mamata Banerjee 28 ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर!

मात्र तृणमुल कॉंग्रेसमध्ये (Trinamool Congress) फूट पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबर इतर अनेक पक्ष युध्दपातळीवर प्रयत्न करु लागले आहेत.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागलं आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अनेक पक्षांचे प्रमुख नेते गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी येऊ लागले आहेत. यातच सत्ताधारी भाजपबरोबर (BJP) कॉंग्रेस, महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षांसह इतर पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. तृणमुल कॉंग्रेस गोव्यात दाखल झाल्यापासून राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागू लागले आहे. मात्र तृणमुल कॉंग्रेसमध्ये (Trinamool Congress) फूट पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबर इतर अनेक पक्ष युध्दपातळीवर प्रयत्न करु लागले आहेत.

यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी पहिल्यांदाच 28 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोव्यात दाखल झाल्यानंतर त्या राज्यातील कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारला उलथवून टाकण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास असल्याचे तृणमुल नेत्यांकडून सूचित करण्यात येत आहे. तसेच राजनिती रणनीतिकार प्रशांत किशोर मागील काही महिन्यांपासून गोव्यात तळ ठोकून आहेत. जेव्हा ममता बॅनर्जी गोव्याला जातील तेव्हा ते तेथे असतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Mamata Banerjee
राहुल गांधी या महिनाअखेरीस गोवा दौऱ्यावर!

गोवा विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो (Luizinho Faleiro) यांच्याबरोबर कॉंग्रेसमधील बडे नेते आधीच टीएमसीमध्ये सामील झाली आहेत. टीएमसीने जूनमध्येच गोव्यात विधानसभा निवडणूकीचे काम सुरु केले होते. तृणमुल पक्षाच्या नेत्यांना विश्वास आहे की, यावेळी टीएमसी गोव्यात बदल घडवून आणण्यासाठी कार्यतत्पर असेल. तसेच तृणमुल नेते राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन मागील एका महिन्यापासून गोव्यात तळ ठोकून आहेत. माध्यमाला दिलेल्ल्या मुलाखती दरम्यान त्यांनी म्हटले होते की, "गोव्यातील टीएमसीसाठी ही योग्य वेळ आहे, कारण लोकांना योग्य पर्याय हवा आहे. त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसची सत्ता पाहिली. दरम्यान, जेव्हा गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो तृणमुल पक्षात सामील झाले, तेव्हा टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले होते की, “आम्ही पूर्ण ताकदीनिशी गोव्यात लढू. तसेच गोव्यातील भाजप सरकारला उलथवून टाकण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु.''

Mamata Banerjee
राहुल गांधी नंतर आता काँगेसच्या अनेक बड्या नेत्यांचे Twitter अकाऊंट निलंबित

शिवाय, ममतांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केला त्यानंतर खऱ्या अर्थाने कमकुवत काँग्रेसने तृणमुल पक्षाला गोव्यात चांगली संधी दिली, असे तृणमूल काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येते. दुसरीकडे पश्चिम बंगालमधील भाजप प्रवक्ते समीर भट्टाचार्य म्हणाले," सध्या गोव्यात विधानसभा निवडणूकांसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करु. "

दरम्यान, कॉंग्रेसचे गोवा प्रमुख गिरीश चोडणकर म्हणाले, "काही लोक टीएमसीमध्ये सामील झाले असले तरी आम्हाला काही एक फरक पडत नाही. सत्तेत असणाऱ्या भाजपला आम्ही खंबीरपणे तोंड देऊ."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com