Goa Election 2022: निवडणूक "स्टंट" नव्हे, जनतेच्या सेवेसाठीच; मुख्यमंत्री डॉ. सावंत

डिचोलीत 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद
Goa Election 2022: CM Dr Pramod Sawant, Speaker Rajesh Patnekar, MLA Pravin Zantye & other Honorable at 'Sarkar Tumchya daari' Program in Bicholim
Goa Election 2022: CM Dr Pramod Sawant, Speaker Rajesh Patnekar, MLA Pravin Zantye & other Honorable at 'Sarkar Tumchya daari' Program in BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: 'सरकार तुमच्या दारी' (Sarkar Tumchya Daari) हा उपक्रम म्हणजे निवडणूक 'स्टंट' नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठीच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. (Goa Election 2022) गोवा मुक्तीचे साठावे वर्ष (60th Goa Liberation) साजरे करतानाच राज्यातील एकही गोमंतकीय मूळ गरजा आणि सरकारी योजनांपासून वंचित राहता कामा नये. यासाठीच आपल्या सरकारची (Goa Govt) ही प्रामाणिक संकल्पना आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी स्पष्ट केले. डिचोलीत 'सरकार तुमच्या दारी' या उपक्रमाचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित जनतेला संबोधित करताना बोलत होते. येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी (ता. 26) डिचोली आणि मये मतदारसंघातील जनतेसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Goa Election 2022: CM Dr Pramod Sawant, Speaker Rajesh Patnekar, MLA Pravin Zantye & other Honorable at 'Sarkar Tumchya daari' Program in Bicholim
Goa: रायबंदर येथे आरोग्य केंद्रासाठी प्रक्रिया सुरु

साधनसुविधात्मक विकासासह मानवी विकासावर सरकारचा भर आहे. 'कोविड' संकटासह चक्रीवादळ आणि पूर आपत्तीचाही सरकारला सामना करावा लागला. तरीदेखील राज्याच्या विकासावर परिणाम होवू दिला नाही. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. सरकारच्या वेगवेगळ्या मिळून दिडशे योजना आहेत.'नो युअर स्कीम' अंतर्गत सरकारच्या पोर्टलवर त्यांची माहिती उपलब्ध आहे. या योजना राज्यातील अत्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोचविणे सरकारचे ध्येय आहे. आजही काही ग्रामीण भागातील जनता वीज आदी मूलभूत समस्यांपासून वंचित असल्याचे समजते. त्यावेळी आपल्याला अत्यंत वाईट वाटते. अशी खंत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त करून, राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावागावातून प्रयत्न व्हायला हवेत. असे नमूद केले.

यावेळी डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर, मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, महसूल खात्याचे सचिव संजयकुमार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय आणि नगराध्यक्ष कुंदन फळारी उपस्थित होते.

Goa Election 2022: CM Dr Pramod Sawant, Speaker Rajesh Patnekar, MLA Pravin Zantye & other Honorable at 'Sarkar Tumchya daari' Program in Bicholim
Goa: स्वातंत्र्यसैनिक डॉ. टी. बी. कुन्हा यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

सभापती राजेश पाटणेकर यांनी यावेळी बोलताना सरकार जनतेच्या हितासाठी वावरत असल्याचे सांगितले. 'सरकार तुमच्या दारी' संकल्पना हाती घेतल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे त्यांनी अभिनंदन केले. प्रवीण झांट्ये यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे कौतुक केले. मयेतील स्थलांतरीत प्रश्न आदी समस्या सुटाव्यात. अशी मागणीही त्यांनी केली. 'कोविड' महामारीमुळे बळी पडलेल्या डिचोलीतील काही व्यक्तींच्या कुटुंबियांना मंजूर झालेल्या सानुग्रह आर्थिक मदतीची मंजुरीपत्रे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. हा निधी थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

सुरवातीस श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. कुंदन फळारी यांनी प्रास्ताविक भाषणातून सरकार जनतेच्या हितासाठी वावरत असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन दत्तप्रसाद जोग यांनी केले. तर विश्वास चोडणकर यांनी आभार मानले. उदघाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्र तसेच सरपंचांबरोबर संवाद साधून प्रत्येक पंचायत क्षेत्रातील समस्या आणि प्रश्न जाणून घेतले. डिचोली पालिकेशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

Goa Election 2022: CM Dr Pramod Sawant, Speaker Rajesh Patnekar, MLA Pravin Zantye & other Honorable at 'Sarkar Tumchya daari' Program in Bicholim
Goa Politics: पेडणे तालुक्यातील लाखों चौ.मी. जागेची विक्री संशयाच्या घेऱ्यात

मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच, ढोल-ताशांच्या गजरात आणि भाजपच्या डिचोली आणि मयेतील महिला कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले. मुख्यमंत्र्यांबरोबर सभापती राजेश पाटणेकर आणि आमदार प्रवीण झांट्ये हे होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

1 हजार 510 जणांची नोंदणी

'सरकार तुमच्या दारी' उपक्रमांला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. डिचोली आणि मये मतदारसंघातील मिळून शेकडो नागरिक उपस्थित होते. पैकी 1,510 जणांनी नोंदणी केली होती. वेगवेगळ्या मिळून जवळपास 40 खात्यांचे अधिकारी डिचोलीत उपस्थित होते. प्रत्येक खात्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमातून जनतेला सरकारी योजनांची माहिती देतानाच आधारकार्ड दुरुस्ती आदी प्रशासकीय अडीअडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध करण्यात आली होती. याव्यतिरिक्त दंत, नेत्र आदी आरोग्य विषयक तपासणी तसेच लसीकरणाचा दुसरा डोस देण्याचीही व्यवस्था उपलब्ध करण्यात आली होती. प्रचंड गर्दी झाल्यामुळे काही नागरिकांचा गोंधळ उडाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com