Goa Election 2022: शिरोड्यात शेवटच्या टप्प्यात 'आप' ने मारली मुसंडी

शिरोड्याचे विद्यमान आमदार सुभाष शिरोडकर हे बॅकफुट गेल्यासारखे दिसून येत आहे
Subhash Shirodkar
Subhash Shirodkar Dainik Gomanatk
Published on
Updated on

शिरोडा: शिरोड्यात अंतिम टप्प्यात समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. विद्यमान आमदार सुभाष शिरोडकर हे एकतर्फी जिंकणारकी काय असे वाटत असताना आम आदमी पक्षाचे उमेदवार माजी मंत्री महादेव नाईक यांनी बरीच आघाडी घेतल्याचे दिसते आहे.

आप पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शिरोडा येथे झालेल्या सभेनंतर वातावरणात आमुलाग्र बदल झाल्यासारखा वाटायला लागला आहे. त्यामूळे काल परवा पर्यंत आघाडीवर आहे असे वाटणारे शिरोड्याचे विद्यमान आमदार सुभाष शिरोडकर हे बॅक फुट गेल्यासारखे दिसायला लागले आहेत.

Subhash Shirodkar
काँग्रेसने गोमंतकीयांची माफी मागावी: सी. टी. रवी

कोपरा बैठकीतही याचा प्रत्यय यायला लागला आहे. तिथे त्यांना अनेक प्रश्न विचारून लोक भंडावताना दिसत आहेत. महादेव नाईक सुभाष शिरोडकर हे 2007 सालापासून एकामेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात उभे असतात. 2007 व 2012 साली महादेवांचा तर 2017 व 2019 च्या पोटनिवडणूकीत सुभाषांचा विजय झाला होता. त्यामुळेच आता या संघर्षाला एक वेगळीच धार प्राप्त झाली आहे.

Subhash Shirodkar
मुंबई-गोवा महामार्ग-लोहमार्ग बंद पडतो तेव्हा...

सध्या महादेवानी शिरोडा मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांना प्रतिसाद चांगला लाभत आहे. ते या मतदारसंघाचे माजी मंत्री असल्यामुळे त्यांचा मतदारांशी चांगला संपर्क आहे. त्याचा ही त्यांना फायदा होत आहे. सुभाष हे अनुभवी खिलाडी असले तरी सुध्दा भाजपसरकारने केलेल्या चूकांची उत्तरे त्यांना द्यावी लागत आहेत. गृहआधारचे पैसे का मिळाले नाहीत. लाडली लक्ष्मीचे पैसे का अडकले, काही भागात पाणी का मिळत नाही.

Subhash Shirodkar
देवेंद्र फडणवी: अन्याय झाल्याचे सांगून मते मिळवण्यासाठी ची धडपड

अशा प्रश्नांना सध्या सुभाषांना तोंड द्यावे लागत आहे. महादेवांबाबत ही समस्या उद् भवत नाही. ते गेली पाचवर्षे आमदार नसल्यामुळे मतदारसंघातील समस्यांशी त्यांची बांधीलकी नाही. त्यामुळे ते अगदी उघडपणे मतदारांशी सामना करताना दिसतात. त्याचबरोबर आपल्या कारकीर्दीत काही चूका झाल्या असल्या तरी त्याची माफी मागायलाही ते मागे पूढे पाहत नाही. या दोघांच्या स्पर्धेत सध्या मगोप व कॉग्रेस बरीच मागे पडल्यासारखी झाली आहे.

Subhash Shirodkar
गोव्यात काही पक्ष डिपॉजिट जप्त करून घेण्यासाठी निवडणूक लढवत आहेत: फडणवीस

मगोपचा उमेदवार हा मतदारसंघाबाहेरचा असल्यामुळे तो शिरोड्याच्या लोकांना परक्यासारखा वाटतो. कॉग्रेसबदद्ल बोलायचे तर कॉग्रेसमधील अंतर्गत दुही त्यांच्या मुळावर येताना दिसते. सध्या शिरोड्यातील कॉग्रेसीत दोन गट झाले असून एक गट संभाजी ब्रिगेडचे उमेदवार मुकेश नाईक यांच्याबरोबर आहे.

तर दुसरा गट कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार तुकाराम बोरकर यांच्याबरोबर वावरताना दिसत आहे. वास्तवीक शिरोड्यात मगोपची कॉग्रेसची स्वतःची अशी मते आहेत. पण चुकीचा उमेदवार दिल्यामुळे तसेच दुहींमुळे या दोन्हीही पक्षांना मार बसताना दिसायला लागला आहे.

राष्ट्रवादीतर्फे डॉ. सुभाष प्रभुदेसाई हे रिंगणात असून त्यांना सुभाषविरोधी मते प्राप्त होऊ शकतात. डॉ. प्रभुदेसाई हे शिरोड्यातील लोकप्रिय डॉक्टर असून ही लोकप्रियता मतदानात परिवर्तित होते की काय हे बघावे लागेल. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे शैलेश नाईक हे रिंगणात असून स्नेहलो ग्रासियश यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पण सध्या या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास आपचे महादेव नाईक यांचे पारडे जड वाटते. आता हे खरेच पारडे जड राहते की काय सुभाष शिरोडकर आठव्यांदा विधानसभेत पोहचतात की काय याचे उत्तर 10मार्चलाच मिळणार हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com