रेनकोट, गणवेशासाठी शिक्षण खात्याकडून मिळणार अनुदान अत्यल्प; 1100 ऐवजी 2000 रुपये देण्‍याची पालकांची मागणी

goa education department raincoat uniform grant: राज्यात प्राथमिक शाळांतील पहिली ते तिसरीतील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट खरेदीसाठी शिक्षण खात्याकडून प्रतिविद्यार्थी १,१०० रुपये पालकांच्या बँक खात्यात १५ जुलैपूर्वी जमा केले जाणार आहेत.
goa education department raincoat uniform grant
goa education department raincoat uniform grantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात प्राथमिक शाळांतील पहिली ते तिसरीतील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट खरेदीसाठी शिक्षण खात्याकडून प्रतिविद्यार्थी १,१०० रुपये पालकांच्या बँक खात्यात १५ जुलैपूर्वी जमा केले जाणार आहेत. मात्र वाढत्या महागाईत ही रक्कम अपुरी असल्याचे म्हणत पालकांकडून किमान २००० रुपये अनुदान देण्याची मागणी होत आहे.

पालकांचे म्हणणे आहे की, सध्या एक जोडी गणवेश शिवण्यासाठीच सुमारे ८०० रुपये खर्च येतो. विद्यार्थ्यांसाठी किमान दोन जोड्या आवश्यक असल्याने केवळ गणवेशावरच सुमारे १५०० रुपयांपर्यंत खर्च जातो. त्यात रेनकोटचा खर्च धरल्यास ११०० रुपयांत सर्व व्यवस्था करणे कठीण होते.

goa education department raincoat uniform grant
CP Radhakrishnan Goa Visit: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज गोव्‍यात, घटक राज्यदिन सोहळ्‍याला शनिवारी लावणार उपस्‍थिती

या पार्श्वभूमीवर सरकारकडून मिळणारी रक्कम अपुरी असल्याची भावना व्यक्त होत असून, ‘आवळा दाखवून कोहळा काढण्याचा प्रकार’ असा सूरही पालकांमध्ये उमटत आहे.

goa education department raincoat uniform grant
Goa Illegal Call Center: वेर्ण्यात अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश, 26 जणांना अटक; 145 लॅपटॉप, 45 मोबाईल फोनसह 55 लाखांचे साहित्य जप्त

पूर्वी थेट गणवेश, आता रोख मदत

पूर्वी शिक्षण खात्यामार्फत विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट थेट पुरवले जात होते. मात्र विद्यार्थ्यांना स्वतःच्या पसंतीनुसार रेनकोट घेता यावा आणि गणवेश पालकांनी निवडावा या उद्देशाने नंतर रोख रक्कम देण्यास सुरुवात करण्यात आली. तथापि, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम खूपच कमी असल्याचे पालकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com