ED Raid: गोव्यात 'ईडी'ची मोठी कारवाई! 2.86 कोटींची मालमत्ता जप्त; आलिशान व्हिला, अनेक भूखंडांचा समावेश

ED Raid Goa: जप्त केलेल्या संपत्तीत दक्षिण गोव्यातील एक निवासी व्हिला तसेच अनेक भूखंडांचा समावेश असून त्याची एकत्रित किंमत २.८६ कोटी एवढी आहे. प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ED Raid
ED RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील एका बँक फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत क्राऊन मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनी आणि तिच्या भागीदारांची दक्षिण गोव्यातील २.८६ कोटींहून अधिक किमतीची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.

या जप्तीत एक अलिशान निवासी व्हिला आणि एकापेक्षा अधिक प्लॉट्सचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. ‘ईडी’ने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘सीबीआय’च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने नोंदवलेल्या प्राथमिक गुन्हा नोंदीवर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे.

या एफआयआरमध्ये, कंपनी आणि भागीदार यांनी बँकेकडून तब्बल ७ कोटींचे कर्ज फसवणूक करून मिळविले असल्याचा गंभीर आरोप आहे. जप्त केलेल्या संपत्तीत दक्षिण गोव्यातील एक निवासी व्हिला तसेच अनेक भूखंडांचा समावेश असून त्याची एकत्रित किंमत २.८६ कोटी एवढी आहे.

ED Raid
ED Raid Casinos: पणजी, कळंगुट येथील 7 कॅसिनोंवर ईडीचे छापे, कर्नाटकातही 30 जागांवर कारवाई

‘ईडी’कडून या प्रकरणी मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपासात आणखी मालमत्ता व आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला जाणार असल्याचेही सूचित केले.

ED Raid
ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

मनी लॉन्डरिंगचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी बँकेला गहाण म्हणून दाखवलेली जमीन आणि इतर मालमत्ता आधीच विविध बँकांकडे तारण ठेवलेली होती.

तरीदेखील त्यांनी कागदोपत्री फेरफार करून तीच मालमत्ता वारंवार गहाण दाखवत कर्ज उचलले.

मिळालेला कर्जाचा मोठा हिस्सा नंतर वैयक्तिक खात्यांमध्ये वळवून मनी लॉन्डरिंगद्वारे वापरल्याचा संशय ‘ईडी’ला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com