Goa E20 Petrol: गोव्यात 'ई-20' पेट्रोलविरोधात 'आप' आक्रमक! इंधन निवडण्याचा अधिकार वाहनधारकांना देण्याची वाल्मिकी नाईक यांची मागणी

E20 Petrol Mileage: गेल्या काही महिन्यांपासून गोव्यात २० टक्के इथेनॉल मिश्रित ‘ई-२०’ पेट्रोलची विक्री होत असून, वाहनधारकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
E20 Petrol Mileage
Goa E20 PetrolDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही महिन्यांपासून गोव्यात २० टक्के इथेनॉल मिश्रित ‘ई-२०’ पेट्रोलची विक्री होत असून, वाहनधारकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. योग्य नियोजनाशिवाय भाजप सरकारने ‘ई-२०’ची अंमलबजावणी केली आणि त्याचा भार सामान्य वाहनधारकांवर टाकला, अशी टीका ‘आप’चे राज्‍य निमंत्रक वाल्‍मिकी नाईक यांनी केली.

पणजीत बुधवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर-देसाई व इतर पदाधिकारी यावेळी उपस्‍थित होते. ‘‘पेट्रोल पंपांवर व वाहन दुरुस्ती केंद्रांवर नागरिकांशी संवाद साधताना अनेक वाहनधारकांनी मायलेजमध्ये स्पष्ट घट झाल्याचे आम्‍हाला सांगितले.

E20 Petrol Mileage
AAP Goa: आतिशींकडे पुन्हा राज्य प्रभारीपद, आम आदमी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा

तर अनेक मेकॅनिकांनी इंधनाच्या बदललेल्या संरचनेमुळे वाहनांसंदर्भातील तक्रारी वाढत असल्‍याची माहिती दिली. ग्राहकांना त्यांच्या वाहनासाठी योग्य इंधन निवडण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे.

ग्राहकांना पारदर्शकता आणि माहितीपूर्ण निवडीचा अधिकार मिळायला हवा. त्यांच्यावर सक्तीने ‘ई-२०’ पेट्रोल लादले जाऊ नये. तसेच, कमी मायलेज देणाऱ्या या इंधनाची किंमत नियमित पेट्रोलपेक्षा कमी असावी’’ अशा मागण्‍या त्‍यांनी केल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com