
Mahatma Gandhi Jayanti 2025: दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रपिता' महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर आता गोवा सरकारने 2 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात मोठा निर्णय घेतला. या दिवशी गोव्यातील सर्व कॅसिनोमधील ऑपरेशन्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. यासोबतच, उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण राज्यभरात दारु विक्रीवरही बंदी लागू करुन 'ड्राय डे' (Dry Day) घोषित केला.
गृह विभागाने सर्व कॅसिनो परवानाधारकांना (Casino Licensees) या आदेशाची माहिती दिली आहे. या दिवशी कॅसिनोचे कामकाज 24 तासांसाठी थांबवणे अनिवार्य असेल.
कॅसिनोचे कामकाज 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.00 वाजल्यापासून (म्हणजेच 2 ऑक्टोबरच्या पहाटेपासून) ते 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत (म्हणजेच 2 ऑक्टोबर आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत) पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने स्पष्ट केले की, सर्व कॅसिनो (Casino) मालकांनी या नियमांचे सक्तीने पालन करावे, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
कॅसिनो बंद ठेवण्याच्या आदेशासोबतच, उत्पादन शुल्क आयुक्तांच्या कार्यालयाने 2 ऑक्टोबर 2025 रोजी दारु विक्रीवरही संपूर्ण बंदी घालण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त हा दिवस 'ड्राय डे' म्हणून पाळला जाईल. या आदेशानुसार, दारु विकणारी सर्व दुकाने तसेच, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्समध्ये दारु पिण्याची किंवा तिची विक्री करण्याची सर्व आस्थापने दिवसभर बंद राहणार आहेत.
हा निर्णय गोवा सरकारच्या (Goa Government) वतीने राष्ट्रीय भावना आणि आदराचे प्रतीक म्हणून घेण्यात आला आहे. गोव्यात आलेल्या पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या दोन्ही आदेशांची (कॅसिनो बंद आणि ड्राय डे) नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 2 ऑक्टोबर रोजी कुठल्याही दुकानातून दारुची विक्री किंवा कॅसिनोमध्ये गेमिंगचे व्यवहार आढळल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. महात्मा गांधींनी घालून दिलेल्या नैतिक मूल्यांना आदरांजली वाहण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.