22 January Dry Day: 'या' भाजपशासित राज्यांनी घेतला मोठा निर्णय; 22 जानेवारी ड्राय डे घोषित

22 January Dry Day: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
22 January Dry Day
22 January Dry DayDainik Gomantak

22 January Dry Day: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. हे लक्षात घेऊन विविध राज्यांनी त्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने 22 जानेवारीला सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यूपी उत्पादन शुल्क आयुक्तांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ''अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी अभिषेक सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यातील सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंद संदर्भात परवानाधारक कोणत्याही नुकसान भरपाईचा किंवा दाव्यास पात्र असणार नाही. सूचनांचे पालन करण्याचे सुनिश्चित करा.''

आसाम

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 22 जानेवारी हा दिवस राज्यात ड्राय डे म्हणून घोषित केला आहे. त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, 'आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत रामलल्ला अभिषेक सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' तसेच मुख्यमंत्र्यांनी महिला उद्योजकता अभियानाला मान्यता दिली. ही एक नवीन योजना आहे जी ग्रामीण महिला उद्योजकांना आर्थिक मदत करेल.

22 January Dry Day
Ram Madir: अयोध्येत हॉटेल बुकिंगचे सर्व विक्रम मोडीत! 22 जानेवारीला एका खोलीचे भाडे एक लाख रुपये

उत्तराखंड

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 22 जानेवारी हा दिवस राज्यात ड्राय डे म्हणून घोषित केला आहे. त्याचे पालन सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. धामी यांनी लोकसहभागातून रामलल्लाचा प्रसाद वाटपाच्या व्यवस्थेवर भर दिला. मुख्य मंदिर आणि गुरुद्वारांमध्ये 22 जानेवारीला प्रसाद वाटप करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. या प्रसादात उत्तराखंडमधील बाजरीचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

छत्तीसगड

छत्तीसगड सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आल्या आहेत. छत्तीसगड उत्पादन शुल्क कायदा, 1915 च्या कलम 24 च्या उपकलम (1) अंतर्गत ड्राय डेबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 22 जानेवारी रोजी राज्यातील सर्व देशी दारुची दुकाने, रेस्टॉरंट बार, हॉटेल बार आणि क्लब बंद राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com