Dry Fish: ..आयज आमगेर खाऱ्याचे! पावसाळ्याची तयारी 'खारवलेली मासळी'

Dried Fish: खाऱ्या'ची कढी, किसमूर, खाऱ्याचे तळलेले, लोणचे इत्यादी लोकप्रिय पाककृतींची प्रक्रिया एप्रिल-मे महिन्यात सुकायला ठेवलेल्या हरवलेल्या माशांपासून सुरू होते असे.
Dry Fish
Dried Fish in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वर्षाच्या प्रत्येक मोसमात गोव्यातील काही रस्त्यांचे दृश्य विविध प्रकारे बदलते. पावसाळ्यात डांबर वाहून जाऊन रस्त्यावरील खड्डे अधिकच रुंद होतात ही बाब सोडून द्या पण रस्त्यांच्या कडेला गवत छान वाढताना आणि आजूबाजूला फुले उमलतानाही दिसतात.

पावसाळा संपल्यानंतर झालेल्या कापणीचे पीक सुकण्यासाठी अंथरल्यानंतर हे रस्ते पिकून पिवळेही होतात. आता एप्रिल महिना सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या या दिवसात रस्त्यांवर अनेक ठिकाणी खारवलेली मासळी सुकायला घातलेली दिसेल. कोळंबी, बांगडे, मोरी, दोडयारे आदी सुकायला घातलेले मासे आपली सोनेरी झाक घेऊन रस्त्यांच्या भल्या मोठ्या कॅनव्हासवर तीव्र गधांसह या दिवसात वेधक कोलाज तयार करत राहतील. 

पावसाळ्यातील खवळलेला समुद्र आणि त्या कालावधीत लागू करण्यात येणारी मासेमारी बंदी यामुळे निर्माण झालेल्या ताज्या माशांच्या टंचाईवरचा 'खारवलेल्या माशांचा' उपाय मत्स्यप्रेमींच्या जेवणाच्या ताटाला एक प्रकारे संजीवनी देतो. त्या दिवसात 'खारे' हा शब्द विशेषण म्हणून नव्हे 'सामान्य नाम' म्हणून अधिक चलनात येतो. 'आयज आमगेर खाऱ्याचे....' हे वाक्य ऐकल्यानंतर जेवणात कुठला खारा मासा होता, पदार्थ कुठला होता याची अधिक चौकशी करायला ऐकणारा जात नाही. 'खारे' या शब्दातच माशांचे (आणि त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे) द्वैत लोप पावते.  

मासे वाळवण्याच्या प्रक्रियेत, साधारणपणे, जाळ्यात आलेले जास्तीचे ताजे मासे खारवून 3 ते 5 दिवस उन्हात वाळवले जातात. अर्थात हा कालावधी माशांच्या प्रकारावर  आणि हवामानाच्या परिस्थितीवरही अवलंबून असतो. उघड्यावर मासे सुकवण्याची पद्धत स्वच्छतेच्या साऱ्या नियमांना टांग देणारी असली तरी तशा पद्धतीने खारवलेल्या माशांची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही.‌ अलीकडच्या काळातील, खारे मासे सुकवण्यासाठी 'सोलर ग्रीन हाऊस ड्रायर्स'चा केला जाणारा वापरही स्वच्छ व पर्यावरणस अनुकूल असाच आहे. यामुळे मासे सुकवण्याचा कालावधीही फार कमी होतो आणि या पद्धतीतून खारवलेल्या माशांना चांगला बाजारभावही मिळतो.

Dry Fish
Goa fishing: इज फिश कमिंग फ्रॉम स्काय? गोव्यातील मासे नष्ट होताहेत, अधिवासासाठी तडफडत आहेत

खाऱ्या'ची कढी, किसमूर, खाऱ्याचे तळलेले, लोणचे इत्यादी लोकप्रिय पाककृतींची प्रक्रिया एप्रिल-मे महिन्यात सुकायला ठेवलेल्या हरवलेल्या माशांपासून सुरू होते असे आपण नक्कीच म्हणू शकतो. पावसाळ्याच्या तयारीसाठी उन्हाळ्यात वाळवलेल्या माशांचा साठा गोमंतकीय घरांमध्ये करायला सुरुवात होते. खारवलेल्या माशांसाठी आपल्या ठराविक विक्रेत्यांना भेट देण्यास या दिवसातच सुरुवात होते. माशांचे प्रकार, त्यांचा आकार आणि त्यांना असलेली मागणी यावर त्यांची किंमत अवलंबून असते. काही माशांची किंमत नगानुसार ठरते तर सुकवलेली कोळंबी (गालमो) शेराच्या मापाने विकली जाते. 

Dry Fish
Goa Fishing: मच्छीमारांवरील प्रश्‍नाला हळर्णकरांकडून बगल, टाळाटाळीच्या भूमिकेमुळे तीव्र संताप; संघटनेचा आंदोलनाचा इशारा

गोव्याच्या बाजारात कारवारची सुकी मासळी

कारवारमध्ये सुक्या मासळीचा मोठा बाजार भरतो या दिवसात तिथे विविध प्रकारची सुकी मासळी उपलब्ध असते.‌ गोव्याच्या तुलनेने कारवार तसेच मालवणमध्ये सुकी मासळी स्वस्त मिळत असल्याकारणाने सुक्या मासळीचे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणाहूनही ती गोव्याच्या बाजारात आणली जाते. अनेक दर्दी खवय्ये तर स्वतः त्या ठिकाणी आवर्जून जाऊन खारवलेले मासे विकत घेऊन येतात. तर, आताच उन्हाळा सुरू झाला आहे. जसजसा तो वाढत जाईल तसतशी खारवलेल्या माशांची मागणीही वाढत जाईल. उन्हाळ्याच्या अगदी तर ती शिगेला पोचलेली असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com