Goa Drugs Case: ग्रामीण गोव्यालाही ड्रग्‍सचा विषारी विळखा; कर्नाटक-महाराष्‍ट्रातून आयात, गोमंतकीयांचा शिरकाव

Drugs Import From Karnataka-Maharashtra: हिमाचल-नेपाळमधून चरस, तर झारखंडमधून येतो गांजा
Supply of drugs from Orissa, Karnataka to Goa
Supply of drugs from Orissa, Karnataka to GoaDainik Gomantak

Drugs Import From Karnataka-Maharashtra: दोन दिवसांपूर्वी कुडचडे येथे सामोसा विकणाऱ्या युनूस माताजी याला अटक करून 35 हजारांचे हॅश ऑईल जप्‍त केल्‍यामुळे गोव्‍यातील ग्रामीण भागातही आता अमली पदार्थ बिनदिक्कतपणे पोहोचल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

गाेव्‍यात मुख्‍यत: चरस आणि गांजाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. चरस मुख्‍यत: हिमाचल प्रदेश, नेपाळ आणि उत्तर भारतीय राज्‍यांतून येतो, तर गांजा हा झारखंड, ओडिशा येथून कर्नाटक, महाराष्‍ट्र मार्गे गोव्‍यात आणला जातो.

दिवसेंदिवस हा ड्रग्सचा विळखा घट्ट होत चालला आहे. हल्‍लीच पोलिस समन्‍वय समितीची ऑनलाईन पद्धतीने बैठक झाली. त्‍यावेळी ही माहिती उघड झाली.

Supply of drugs from Orissa, Karnataka to Goa
Goa Crime: डिजे म्हणून आला अन् ड्रग्स तस्कर बनला; आसगावात 50 लाखांचे अमली पदार्थ जप्त

गोमंतकीयांचा शिरकाव

गोव्‍यात आतापर्यंत जे ड्रग पेडलर्स पकडले आहेत त्‍यापैकी बहुतेकजण हे ओडिशा, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल येथील असले तरी आता या व्‍यवसायात गोमंतकीय तरुणही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.

यावर्षी जून महिन्‍यापर्यंतची जी आकडेवारी हाती आली आहे, त्‍यात अटक केलेल्‍या ८९ पेडलर्सपैकी ५३ जण अन्‍य राज्‍यांतील, तर २५ जण गोमंतकीय आहेत. या सहा महिन्‍यांत ११ विदेशींना ड्रग्‍स तस्‍करीप्रकरणी अटक केली आहे.

Supply of drugs from Orissa, Karnataka to Goa
Teachers Day: शिक्षण व्यवस्थेवर आता प्रशासनाची बारीक नजर; विद्या समीक्षा केंद्राची लवकरच स्थापना

"गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्‍यामुळे राज्यात अनेक ठिकाणांहून ड्रग्‍स येते. गोवा हे ड्रग्‍स उत्‍पादन करणारे राज्‍य नाही. येेथे फक्‍त बाहेरून आलेले ड्रग्‍स विकले जातात." "ड्रग्स माफियाचा नामोनिशाण संपविण्यासाठी गोवा पोलिस वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून प्रयत्‍न करत आहेत. हल्‍लीच जे इटालियन डिजे गाेव्‍यात ड्रग्‍स विक्रीसाठी घेऊन आले होते, त्याची माहिती मिळाल्‍यावर पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून ५० लाखांचे ड्रग्‍स जप्‍त केले."

बॉस्युएट सिल्‍वा, अधीक्षक, अमली पदार्थविरोधी विभाग.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com