Goa Crime: डिजे म्हणून आला अन् ड्रग्स तस्कर बनला; आसगावात 50 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: संशयित डीजे बॉबलहेड हा संगीत कार्यक्रमांसह ड्रग्स व्यवसायात गुंतला होता
ANC Goa Arrest Italian DJ and his accomplice In Drugs Case
ANC Goa Arrest Italian DJ and his accomplice In Drugs CaseDainik Gomantak

Italian DJ Arrested In Goa For Possessing Drugs: आसगाव येथील एका फ्लॅटवर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने आज पहाटे छापा टाकला.

या कारवाईवेळी फ्लॅटमध्ये राहात असलेला इटलीचा डिजे मायकल लॉरेन्स स्टेफ्फेनोनी (वय ३२ वर्षे) ऊर्फ डिजे बॉबलहेड आणि नेल वाल्टर (वय २८ वर्षे) या दोघांकडे ५० ग्रॅम एलएसडी द्रव्य आणि ५० ग्रॅम चरस सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

या ड्रग्सची किंमत सुमारे ५० लाख २५ हजार रुपये आहे. या दोघांनाही न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी दिल्‍याची माहिती पोलिस उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांनी दिली. डीजे बॉबलहेड हा संगीत कार्यक्रमांसह ड्रग्स व्यवसायात गुंतला होता.

ANC Goa Arrest Italian DJ and his accomplice In Drugs Case
Crime News: अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी 20 वर्षीय युवकास अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

हणजूण आणि वागातोर येथे दोन वेगवेगळ्या नामांकित नाईट क्लबमध्ये डिजे बॉबलहेड याच्या दोन संगीत पार्ट्यांचे शो होणार असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री होणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.

त्यानुसार शनिवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी बॉबलहेड राहात असलेल्या भाडेपट्टीवरील फ्लॅटवर पाळत ठेवली होती. बॉबलहेड याने एलएसडी ड्रग्स पार्टीमध्ये विकण्यासाठी आणले होते.

ते त्याच्याकडून जप्त केले, तर त्याच्यासोबत फ्लॅटमध्ये राहात असलेल्या नेल वाल्टर याच्याकडून ५० ग्रॅम चरस जप्त केले. अमली पदार्थविरोधी पथकाने किनारी भागात ड्रग्ससंबंधी गेल्या २४ तासांत केलेली ही दुसरी कारवाई आहे.

ANC Goa Arrest Italian DJ and his accomplice In Drugs Case
Porvorim Accident: ताबा सुटला अन् घात झाला; भरवेगाचे तीन बळी

आता डिजे रडारवर

  1. किनारी भागात संगीत पार्ट्यांमध्ये ड्रग्सची उलाढाल होत असल्याने ड्रग्सविरोधी तसेच जिल्हा पोलिस देखरेख ठेवून आहेत. या ड्रग्स व्यवहारात दलालांसह संगीत कार्यक्रम करणारे डिजेही गुंतले असल्याचे या प्रकरणानंतर स्पष्ट झाले आहे.

  2. या पार्ट्यांमधील ड्रग्सच्या उलाढालीसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी खास खबरे तैनात केले आहेत. पोलिस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दलाल कार्यरत

बॉबलहेड हा पर्यटन व्हिसावर गोव्यात वारंवार येतो. संगीत पार्ट्यांना येणाऱ्या लोकांमध्ये तो आपल्या जवळच्या व्यक्तींमार्फत तो ड्रग्स वितरित करतो.

या ड्रग्समुळे संगीताच्या कर्कश आवाजात लोकही बेभान होऊन नाचायचे. त्यामुळे त्याचा हा जोड व्यवसाय बनला होता. हे ड्रग्स तो गोव्यातीलच दलालांकडून घेऊन त्याची विक्री करायचा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com