Goa Drishti Lifesavers: जीवरक्षकांना चार जणांना वाचवण्यात यश; 11 वर्षीय मुलाला मिळालं जीवनदान

Drishti Lifesavers: दृष्टी जीवरक्षक संस्थेने समुद्रकिनाऱ्यावर या आठवड्यात अनेकांना समुद्रात बुडण्यापासून वाचवले.
goa drishti lifesavers rescued 4 tourists last week
goa drishti lifesavers rescued 4 tourists last week Dainik Gomantak
Published on
Updated on

Drishti Lifesavers: दृष्टी जीवरक्षक संस्थेने समुद्रकिनाऱ्यावर या आठवड्यात अनेकांना समुद्रात बुडण्यापासून वाचवले. वादळी दिवसांमध्ये वाचवलेल्या या ४ जणांत ११ वर्षीय मुलाचा समावेश होता. त्यासोबत चार हरवलेल्या मुलांची प्रकरणे देखील समोर आली. या चारही मुलांना त्यांच्या परिवाराकडे सोपवण्यात आले.

शनिवारी झालेल्या या वादळामुळे हैदराबादमधील (Hyderabad) ११ वर्षांचा मुलगा आणि त्याचा पॅरासेलिंग प्रशिक्षक वार्का समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करत असताना या वादळात अडकले. त्यांना वादळी संकटात पाहून तैनात जीवरक्षकांनी जलक्रीडा ऑपरेटर आणि  स्थानिक लोकांसह मदतीसाठी धाव घेतली. जोरदार वाऱ्यांमुळे त्यांची बोट समुद्रकिनाऱ्यावर अडकली होती आणि बोटीवरचा पॅराग्लायडिंग संच तुटल्याने ते वाऱ्यातच तरंगत होते.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर ३० वर्षीय व्यक्तीला वाचवण्यात आले. कंबर खोल पाण्यात जाऊन हा माणूस सावधगिरीच्या सूचनेनानंतरही बाहेर आला नाही, त्याच्या या हट्टी स्वभावाला मात देऊन दृष्टीच्या सात जीवरक्षकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

goa drishti lifesavers rescued 4 tourists last week
Drishti Lifesavers Rescue : दृष्टी जीवरक्षकांची उल्लेखनीय कामगिरी! चार जणांना वाचवण्यात यश

मोरजी रिव्हर पॉइंटवर कर्नाटकातील ३० वर्षीय महिला पाण्यात रिप करंटमध्ये अडकली होती. तिला जीवरक्षक विकास चव्हाण आणि दत्ताराम चव्हाण यांनी रेस्क्यू बोर्ड आणि ट्यूबच्या सहाय्याने वाचवले. हणजूण समुद्रकिनाऱ्यावर २५ वर्षीय स्थानिकाला रेस्क्यू बोर्डसह वाचवण्यात आले. तो रिप करंटमध्ये अडकला होता. या रिप करंटचा सामना करत आनंद परब या जीवरक्षकाने त्याचे प्राण वाचवले. 

कळंगुट समुद्रकिनारी हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन जीवरक्षकांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे पुनर्मीलन करून दिलेल्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. भटकत असलेला पंजाबमधील १० वर्षांचा मुलगा ऑन-ड्युटी  जीवरक्षकाला सापडला, ज्यांनी जीवरक्षक टॉवरवरून घोषणा जारी केली. त्याचे कुटुंब बागा समुद्रकिनाऱ्यावर होते.

त्यांना कळंगुट येथे आणले गेले आणि ओळख प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर हस्तांतर पूर्ण करण्यात आले. महाराष्ट्रातील (Maharashtra) एक चार वर्षांची मुलगी आणि हैदराबादची एक पाच वर्षांची मुलगी जीवरक्षकांना कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सापडली. या दोघांना त्यांच्या पालकांसोबत कळंगुट समुद्रकिनारी पुन्हा एकत्र करण्यात आले.

goa drishti lifesavers rescued 4 tourists last week
Goa Drishti Lifeguard Rescue: जलक्रीडा करताना बोट उलटली; तामिळनाडूतील जोडप्याला दृष्टी जीवरक्षकांनी वाचवले

६२ मुले सुखरूप!

हरवलेल्या मुलांच्या प्रकरणांमुळे २०२४ मध्ये गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर राज्य-नियुक्त जीवरक्षक संस्थेद्वारे पुनर्मिलन झालेल्या मुलांची संख्या ६२ वर पोचली असून ती मुले सुखरुप आहेत. बागा समुद्रकिनारी दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींना जीवरक्षकांनी प्रथमोपचार दिला. पोहताना काचेच्या बाटलीतून घाव लागलेल्या सोलापूर, महाराष्ट्रातील ३५ वर्षीय व्यक्तीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच कर्नाटकातील एका १९ वर्षीय महिलेला पोहताना तिच्या नाकाला मार बसला, तिला आवश्यक प्राथमिक उपचार देऊन खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com