Radical Prostatectomy: डॉ. केदार्स मॅटर्निटीमध्‍ये 'रॅडिकल प्रोस्टेटक्टॉमी' यशस्वी, कर्करोग उपचारात मोठे पाऊल; डॉ. शर्मद कुडचडकर यांची कामगिरी

Goa Radical Prostatectomy: गोव्यात वैद्यकीय इतिहास रचत पहिली रॅडिकल रोबोटिक प्रोस्टेटक्टॉमी यशस्वीरीत्या पार पडली.
Goa Radical Prostatectomy
Goa Radical ProstatectomyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात वैद्यकीय इतिहास रचत पहिली रॅडिकल रोबोटिक प्रोस्टेटक्टॉमी यशस्वीरीत्या पार पडली असून, राज्यातील कर्करोग उपचाराच्या क्षेत्रासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. दक्षिण गोव्याचे नामांकित युरो सर्जन डॉ. शर्मद कुडचडकर यांनी ही शस्त्रक्रिया साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

डॉ. कुडचडकर यांनी एमबीबीएस आणि एमएस गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून तसेच युरोलॉजीमध्ये एम.सीएच. एससीपीजीआय लखनौमधून सुवर्णपदकासह पूर्ण केले आहे.

त्यांनी डीएनबी (युरोलॉजी) मध्ये भारतात प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रपती सुवर्णपदकही प्राप्त केले. लेप्रोस्कोपी, रोबोटिक युरोलॉजी आणि युरो-ऑन्कोलॉजीमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य असून नडियाद येथे त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेत फेलोशिप पूर्ण केली आहे.

Goa Radical Prostatectomy
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

ही शस्त्रक्रिया डॉ. केदार्स मॅटर्निटी, इन्फर्टिलिटी आणि सर्जिकल हॉस्पिटल, पणजी येथे राज्यातील एकमेव रोबोटिक सर्जरी यंत्रणेद्वारे करण्यात आली. शस्त्रक्रिया पथकात डॉ. राज नागरकर, डॉ. शर्मद कुडचडकर, डॉ. ज्योती गडकरी, डॉ. शैलजा पाटील, डॉ. वीणा वेलिंगकर आणि डॉ. निमिषा दुकळे यांचा समावेश होता.

Goa Radical Prostatectomy
Goa vs Gujrat: गोव्याचा सलग दुसरा एकतर्फी विजय, गुजरातचा 4-0 गोलफरकाने फडशा

प्रोस्टेट कर्करोगींना सोयीस्कर

या सुविधेमुळे प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांना आता उपचारासाठी इतर शहारांत जाण्याची गरज नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

गोव्यातील पहिली रोबोटिक गायनॅकॉलॉजी शस्त्रक्रिया २०२१ मध्ये डॉ. केदार फडते यांनी केली होती आणि रोबोटिक हिस्टरेक्टॉमी शस्त्रक्रिया आजही नियमितपणे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com