Goa vs Gujrat: गोव्याचा सलग दुसरा एकतर्फी विजय, गुजरातचा 4-0 गोलफरकाने फडशा

Goa Civil Services Football Tournament: गुजरातचा ४-० गोलफरकाने फडशा पाडला. सामना बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर संध्याकाळी प्रकाशझोतात झाला.
Goa vs Gujrat
Goa vs GujratDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अखिल भारतीय मुलकी सेवा फुटबॉल स्पर्धेत यजमान गोव्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी गुजरातचा ४-० गोलफरकाने फडशा पाडला. सामना बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर संध्याकाळी प्रकाशझोतात झाला.

गोव्याने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मध्य प्रदेशचा ८-० फरकाने धुव्वा उडविला होता. शुक्रवारी गुजरातविरुद्ध गोव्याच्या विजयात नेलिस्टर सिल्वेरा याने दोन, तर डॅनी डायस व रजत नाईक यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेत आता नेलिस्टर याने चार गोल केले आहेत.

Goa vs Gujrat
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने शनिवारी (ता. १३) खेळले जातील. सांताक्रूझ येथील मैदानावर मुंबई व अहमदाबाद, तसेच चेन्नई व कोची यांच्यात लढत होईल. बांबोळी ॲथलेटिक्स स्टेडियमवर सकाळच्या सत्रात उत्तराखंड व दिल्ली यांच्यात, तर गोवा व पाटणा यांच्यात सामना होईल. सामने अनुक्रमे सकाळी साडेआठ व दुपारी साडेतीन वाजता होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com