Goa: माटोळीचा बाजार शहरात नकोच

म्हापशाचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांचे मत (Goa)
Archived photograph of Matoli Bazaar.
Archived photograph of Matoli Bazaar.Google Image

गणेशचतुर्थी उत्सवानिमित्तचा माटोळी बाजार यंदा म्हापसा बाजारपेठेत भरवण्यास बहुतांश नगरसेवकांनी तसेच म्हापशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. (Most of the corporates as well as social workers in Mhapusa have expressed strong opposition to fill the Matoli Bazaar in Mhapusa market this year on the occasion of Ganesh Chaturthi celebrations.) म्हापसा पालिकेने केवळ सोपो (Sopo Tax) गोळा करणाऱ्या कंत्राटदाराचे हित जपू नये, तर तमाम गोमंतकीय जनतेचे हितरक्षण करावे, अशी त्यांची मागणी आहे. गोव्यात सध्या कोविडचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने माटोळी बाजार गतवर्षीप्रमाणे यंदाही बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात (Mapusa Bodgeshwar Temple Area) असलेल्या वाहन पार्किंगच्या ठिकाणी भरवण्यास पालिकेने मुभा द्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. तिथे बाजार भरवण्यास पालिकेला (Multiparty) नेमकी अडचण तरी काय आहे, असा सवालही नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

Archived photograph of Matoli Bazaar.
Goa: शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांसह शिक्षक, शाळा प्रशासनासमोर आव्हान 

डिचोली बाजारपेठेत माटोळी बाजार भरवण्यास तेथील पालिकेने नकार दिला आहे. तेथील सोपो कंत्राटदार शहराबाहेरील असल्याने त्यासंदर्भात निर्णय घेणे त्या पालिकेला शक्य झाले. त्यामुळे स्थानिक राजकारण्यांनी कुणाचे तरी हितरक्षण करण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, म्हापसा पालिकेच्या बाबतीत सोपो कंत्राटदार स्थानिकच असल्याने बाजारपेठेपासून थोड्याशा अलिप्त तथा मोकळ्या वातावरणात माटोळी बाजार भरवण्याचा निर्णय घेण्याबाबत पालिका चालढकल करीत असल्याचा आरोप होत असल्याचा दावा विरोधी गटातीत नगरसेवकांकडून केला जात आहे.

Archived photograph of Matoli Bazaar.
Goa: रशियन युवतीच्‍या खूनप्रकरणी मित्राला अटक

सोपो कंत्राटदाराचे हित पाहून म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी क्लेन मदेरा हे चतुर्थीचा बाजार यंदा म्हापसा बाजारपेठेतच भरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी सध्या म्हापसावासीयांत तसेच विरोधी गटातील नगरसेवकांत सुरू आहे. मुख्याधिकारी महिनाभरापूर्वी आजारी होते तेव्हा स्वत:च्या कर्मचाऱ्याच्या नावाने ते कंत्राट मिळवण्यात यशस्वी ठरलेला तो कंत्राटदार मुख्याधिकारींच्या समवेत तीन दिवस दिवसरात्र त्यांची ‘सेवा’ बजावत होते. माटोळी बाजार यंदा नेमका कुठे भरवावा याविषयी अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सर्व काही पालिका मंडळाच्या बैठकीतच ठरवण्यात येईल व येत्या दोन-तीन दिवसांत ती बैठक होण्याची शक्यता आहे. सध्या गोव्यात कोविडबाधितांची संख्या वाढतच असल्याने यंदाचा माटोळी बाजार गतवर्षीप्रमाणे बोडशेश्वर मंदिराच्या परिसरातच खुल्या वातावरणात घेणे योग्य ठरेल. त्यामुळे पालिकेने कोविडसंदर्भातील धोक्याबाबत दक्ष राहणे हेच शहाणपणाचे ठरेल.

Archived photograph of Matoli Bazaar.
Goa: धुमासे गावात बहरला 'हळदी'चा शेतमळा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com