Goa Disaster Management: गतवर्षीच्या चुकांमधून धडा घेत जिल्हाधिकारी कार्यालय अलर्ट मोडवर

प्रशासनात झाली सुधारणा : उत्तर गोवा जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार
Goa Disaster Management
Goa Disaster ManagementDainik Gomantak

Goa Disaster Management गतवर्षी सत्तरी तालुक्यात आलेल्या पुरामुळे प्रशासनाची उडालेली भंबेरी पाहता यावर्षी प्रशासनाने त्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून बरीच काळजी घेतल्याचे दिसते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार केला गेला आहे, शिवाय आपत्तीबाबत अद्ययावत नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि त्याखाली तलाठी असा क्रम आपत्ती व्यवस्थापन नियंत्रणासाठी ठेवण्यात आला आहे.

परंतु मामलेदार हा तालुक्याचा या प्रक्रियेचा मुख्य आहे, त्यामुळे कोणतीही आपत्ती ओढवली तर मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांनी तेथे अगोदर पोहोचावे. त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर तलाठ्याने तत्काळ पोहोचणे आवश्‍यक आहे.

Goa Disaster Management
Canacona School : काणकोणातील डझनभर शाळांची स्थिती नाजूक

उत्तर गोवा जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी केदार नाईक सांगतात, राज्य सरकारने सर्व सरकारी खात्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतलेले आहे.

मागील वर्षी सत्तरीतील आणीबाणी पाहिल्यामुळे राज्य सरकारने नौदल आणि किनारा पोलिसांनाही या व्यवस्थापनात सहभागी केले आहे.

याशिवाय उत्तर गोव्यात सात ठिकाणी आसरा निवासाची उभारणी केली आहे. तिसवाडीसाठी पणजीत अल्तिनो येथे आसरा निवास उभारण्यात आला आहे.

Goa Disaster Management
Margao Palika : मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारी चेंबरमधून सीसीटीव्ही का हटविले?

आल्तिनो येथील कक्षातून निरीक्षण

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतुकीवर ज्या ठिकाणाहून निरीक्षण करण्यात येत आहे, त्याच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. त्यासाठीची सुविधा निर्माण करण्यात आली असली तरी ती कार्यान्वित होणे बाकी असल्याची माहिती हाती आली आहे.

याशिवाय आसरा निवासांची उभारणी करण्यात आली असून, आपत्ती ओढवल्यानंतर त्याठिकाणी हलविण्यात आलेल्या लोकांना आवश्‍यक त्या सुविधा तेथे पुरविल्या जातील, अशीही माहिती व्यवस्थापन कार्यालयातून मिळाली.

Goa Disaster Management
Bhausaheb Bandodkar: भाऊसाहेब बांदोडकरांचे भव्य स्मारक हवे- खलप

संपर्क क्रमांक जाहीर

सत्तरीत पुरामुळे जशी धावपळ झाली होती, तशी धावपळ पुन्हा होऊ नये म्हणून राज्य सरकारने काळजी घेतली आहे. आपत्ती निर्माण झालीच तर तत्काळ कोणत्या खात्याला संपर्क करता येईल, याचेही संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

त्याशिवाय उपजिल्हाधिकारी आणि मामलेदारांवर मोठी जबाबदारी असल्याने त्यांना प्रथम आपत्ती ओढावलेल्या ठिकाणी तत्काळ जावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com