Canacona School : काणकोणातील डझनभर शाळांची स्थिती नाजूक

देखभालीअभावी दुरवस्था : निवासी परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका
Canacona Government School
Canacona Government SchoolDainik Gomantak
Published on
Updated on

Canacona Primary School : काणकोणात डझनभर शासकीय प्राथमिक शाळा कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यापूर्वी डझनभर शाळा कोसळून भुईसपाट झाल्या आहेत. मात्र, शिक्षण खाते व सरकारने या लोकांच्या पैशांतून गोवा मुक्तीनंतर बांधलेल्या शाळांची योग्य देखभाल न केल्याने या शाळांची पडझड झाली आहे.

काही शाळा निवासी परिसरात आहेत, त्यामुळे या शाळा कोसळल्यास जवळच्या नागरिकांना धोका संभवतो, असे काणकोणचे माजी नगराध्यक्ष संतोष गावकर यांनी सांगितले.

यापूर्वी बोरूस, तामने, शेळी अशा डझनभर शाळा पटसंख्येमुळे बंद पडल्याने सरकारने योग्य देखभाल न केल्याने जमीनदोस्त झाल्या. मात्र, या शाळा उभारण्यासाठी खासगी जमीनमालकांनी विनामूल्य जमिनी दिल्या होत्या. शाळा इमारती जमीनदोस्त झाल्या. मात्र, जमिनीवर सरकारचा पर्यायाने शिक्षण खात्याचा अधिकार राहिला आहे.

Canacona Government School
Goa Police Transfer: राज्यातील 5 पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बदली

सरकारची अनास्था

दरवर्षी काणकोणात तीन ते चार शासकीय प्राथमिक शाळा पटसंख्येअभावी बंद पडतात. त्यानंतर त्या शाळा इमारतींची देखभाल करण्याची कोणतीच योजना सरकारकडे नाही. फक्त ज्या इमारती मतदान केंद्र म्हणून वापरण्यात येतात त्या इमारतींची डागडुजी मतदानाला एक महिना असताना केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com