Margao Palika : मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारी चेंबरमधून सीसीटीव्ही का हटविले?

कर्मचारी वेळेवर येतात, वेळेवर जातात तसेच कर्मचारी खरोखरच काम करतात की नाही हे पाहण्यासाठी हे कॅमेरे बसवले
Margao  Palika
Margao PalikaDainik Gomantak
Published on
Updated on

Madgao Palika : मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांच्या चेंबरमधील सीसीटीव्ही हटविल्याने नगरसेवक महेश आमोणकर यांनी आश्र्चर्य व्यक्त केले आहे. नगरपालिकेच्या सर्वच विभागांसह नगराध्यक्ष व मुख्याधिकारी चेंबरमध्ये सीसीटीव्ही लावले होते.

गत साली लिंडन परेरा नगराध्यक्ष असताना पालिकेत सीसीटीव्ही बसविले होते. गेल्या काही काळापासून मुख्याधिकारी चेंबरमधील सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत नव्हता म्हणून तो काढण्यात आला. जर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्तरावर शिस्त पाळत नसतील तर पालिकेतील सर्व सीसीटीव्ही काढूनच टाकावे, असे आमोणकर म्हणाले.

Margao  Palika
Goa Crime: जयेश चोडणकर मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद, आयआरबी पोलिसाचाही समावेश

काही कर्मचाऱ्यांनीही प्रश्र्न उपस्थित केला आहे की त्यांच्यावरच रोष का? नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या चेंबरमध्ये काय चालले आहे याचे रिकोर्डिंग केले पाहिजे व लक्षही ठेवले पाहिजे. नगरपालिकेने २.५ लाख रुपये खर्चून ३२ सीसीटीव्ही कॅमेरे घेतले होते. कर्मचारी वेळेवर येतात, वेळेवर जातात तसेच कर्मचारी खरोखरच काम करतात की नाही हे पाहण्यासाठी हे कॅमेरे बसवले आहेत.

महेश आमोणकर, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com