Floating Library: राज्यातील सर्व वाचनालये आता 'एकाच छत्राखाली', मांडवी पात्रात सुरू होतेय 'फ्लोटिंग लायब्ररी'; वाचा काय आहेत वैशिष्ट्ये

Goa State Library Policy 2024: राज्‍यातील सर्व वाचनालये आता एकाच छत्राखाली येणार असून त्‍यासाठी ‘ग्रंथालय सेवा संचालनालय’ स्‍थापन करण्‍यात येत आहे.
Goa Floating Library
Goa Floating LibraryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील सर्व वाचनालये आता एकाच छत्राखाली येणार असून त्‍यासाठी ‘ग्रंथालय सेवा संचालनालय’ स्‍थापन करण्‍यात येत आहे. विशेष म्हणजे, मांडवी नदीच्‍या पात्रात ‘तरंगते ग्रंथालय’ सुरू करण्यात येणार आहे. वाचनालयाच्या सर्व सुविधा असलेली सुसज्ज बोट कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या संदर्भातील माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यातील वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रंथालय व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्य मंत्रिमंडळाने आज ‘गोवा राज्य ग्रंथालय वाचनालय धोरण २०२४ ला मंजुरी दिली.

या धोरणातील प्रमुख शिफारस म्हणजे ‘ग्रंथालय सेवा संचालनालय’ या नव्या स्वतंत्र संचालनालयाची स्थापना केली जाणार आहे. यासाठी विद्यमान कायद्याच्या कलम ३ मध्ये दुरुस्ती करून राज्य सरकार आपल्या जबाबदाऱ्या या नव्या संस्थेमार्फत पार पाडेल, असे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Goa Floating Library
Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ हत्तीसाठी वनताराशी संपर्क! विश्वजीत राणे बंदोबस्तासाठी सरसावले; वन खाते ॲक्शन मोडमध्ये

या संचालनालयाच्या छत्राखाली राज्य ग्रंथालय परिषद, राज्य ग्रंथालय विकास कक्ष, राज्य सार्वजनिक ग्रंथालय, सहकारी संस्था तसेच धोरणानुसार आवश्यक समित्यांचा समावेश असेल.

नव्या धोरणांतर्गत ग्रंथालय क्षेत्रात व्यापक प्रशासनिक सुधारणा राबविण्यात येणार असून, संपूर्ण राज्यातील ग्रंथालय व्यवस्थेचा एकात्मिक विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे. ‘गोवा राज्य ग्रंथालय सेवा या नावाने स्वतंत्र मनुष्यबळ संरचना निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. डॉ. नंदकुमार कामत यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे धोरण आखले आहे.

नवीन रचना

१या नव्या यंत्रणेच्या नेतृत्वासाठी राज्य सरकारकडून अनुभवी संचालकाची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्या मदतीसाठी दोन उपसंचालक नेमले जातील. एक ग्रंथालय विकासावर आणि दुसरा प्रशासन व समन्वयावर लक्ष केंद्रित करेल. संचालनालयात ‘ग्रंथालय विकास विभाग’ आणि ‘प्रशासन व समन्वय विभाग’ यांची स्थापना केली जाणार आहे.

२ तसेच ग्रंथालय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना तांत्रिक सल्लागार म्हणून नेमून आधुनिक सेवा व डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यास चालना दिली जाईल.

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी उपाययोजना

१. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर किमान एक राज्यपुरस्कृत सार्वजनिक ग्रंथालय स्थापन करण्यात येईल.

२. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक वॉर्ड तसेच शहरी भागात राज्यपुरस्कृत ग्रंथालय, वाचनालय किंवा अभ्यासिका सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

३. वाचन मंडळे आणि पुस्तक चर्चा गट : शाळा आणि समुदायांमध्ये वाचन मंडळे व पुस्तक चर्चा गट स्थापन करून समूह चर्चेला प्रोत्साहन देणार.

Goa Floating Library
Goa Mining: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम जोरात! 24 ठिकाणी खनिजाचा महालिलाव; सरकारला सुरुवातीलाच मिळणार 200 कोटींचा महसूल

4.साहित्य महोत्सव आणि कार्यक्रम : राज्यभर साहित्य महोत्सव व विविध कार्यक्रम आयोजित करून साहित्याचा गौरव करणे, लेखकांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी देणे आणि सशक्त साहित्य संस्कृती निर्माण केली जाईल.

५. डिजिटल वाचन प्लॅटफॉर्म : ई-पुस्तके, ऑडिओ बुक्स आणि शैक्षणिक ॲप्सच्या माध्यमातून वाचनासाठी डिजिटल साधनांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध वाचनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल.

६. वाचन स्पर्धा : विविध स्तरांवर वाचन स्पर्धांचे आयोजन करून सुदृढ वाचन संस्कृतीला चालना देणार तसेच विद्यार्थ्यांच्या वाचनातील यशाचे कौतुक व सन्मान करणार.

७. ‘लेखक-निवास’ उपक्रम: शाळांमध्ये लेखकांना काही काळ राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची, कार्यशाळा घेण्याची आणि वाचन-लेखनाची आवड निर्माण करण्याची संधी देणारे उपक्रम राबविण्यात येईल.

८. स्थानिक लेखक व प्रकाशकांशी सहकार्य : गोव्याशी संबंधित साहित्य शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी स्थानिक लेखक आणि प्रकाशकांशी सहकार्य वाढवणार, ज्यामुळे स्थानिक साहित्याबद्दल अभिमान व ओळख निर्माण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Women Commission Vacancy
Goa River Survey
Goa Election Commission
Passengers undergo strict screening after Ebola alert
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com