Goa: विधानसभेच्या निवडणुकी पुर्वी धनगर समाजाचे प्रश्न सोडवा

गोवा (Goa) विधानसभेच्या निवडणुकी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घडवून आणण्याची मागणी
Goa: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करताना समाज बांधव
Goa: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करताना समाज बांधवDainik Gomantak
Published on
Updated on

(विधानसभेच्या निवडणुकी पुर्वी प्रश्न सोडविण्याची विनंती, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घडवून आणण्याची केली मागणी)

पिसुर्ले दि 10 (वार्ताहर)- गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा (एसटी) विषय तडीस लावण्यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी तातडीने लक्ष घालून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आज धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने सांखळी रवींद्र भवन येथे त्यांना निवेदन सादर करून केली आहे.

Goa: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करताना समाज बांधव
Goa: वीज बिलातील अघोषित दरवाढीने गोवेकरांना बसला ‘शॉक’

धनगर समाजाचा विषय 1963 साला पासून केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे, आणि त्यात हल्लीच एन डी अगरवाल समितीच्या वतीने पाठवण्यात आलेला सुधारित अहवाल पुन्हा परत आला असल्याने समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे, त्याअनुषंगाने मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी पुर्वी समाजाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.

Goa: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करताना समाज बांधव
Goa: अहवाल परत आल्याने धनगर समाज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आपण या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्या सहकार्याने हा विषय सोडविण्याचे आश्वासन धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. सदर शिष्टमंडळात गोवा धनगर समाज सेवा संघ सत्तरीचे अध्यक्ष बि डी मोटे, उपाध्यक्ष सगो यमकर, कार्यकरणी सदस्य बिरो काळे, गंगाराम पावणे, जानू खरवत, सदस्य बाबलो वरक, डिचोली तालुका धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप वरक, माजी अध्यक्ष भागो वरक (फेटेकर) बार्देश तालुका अध्यक्ष विनायक खरवत, बाबू वरक आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com