Dhangar Community ST Status: धनगर समाजाचा थेट मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम! 2 महिन्यांत न्याय द्या, नाहीतर पुढचा विचार करु; बाबू कवळेकरांचा इशारा

babu kavalekar meet cm pramod sawant: गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्‍यक्ष बाबू कवळेकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली मंगळवारी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
Dhangar Community ST Status
babu kavalekar meet cm pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळविण्‍यासाठी गेल्‍या २३ वर्षांपासून संघर्ष करत असलेल्‍या धनगर समाजाच्‍या विविध संघटनांनी माजी उपमुख्‍यमंत्री तथा गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्‍यक्ष बाबू कवळेकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली मंगळवारी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि दोन महिन्‍यांत न्‍याय मिळवून देण्‍याची मागणी केली. येत्‍या विधानसभा निवडणुकीआधी न्‍याय न मिळाल्‍यास आम्‍हाला पुढील विचार करावा लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

बैठकीनंतर बोलताना कवळेकर म्‍हणाले, राज्‍यात धनगर समाजाची सुमारे ३० हजार एवढी लोकसंख्‍या आहे. २००३ पासून आम्‍ही सातत्‍याने धनगर समाजाला ‘एसटी’ दर्जा मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. याबाबत रजिस्‍ट्रार जनरल ऑफ इंडियाने (आरजेआय) सातत्‍याने काढलेल्‍या त्रुटी राज्‍य सरकारने दुरूस्‍त करून त्‍यासंदर्भातील फायली पुन्‍हा सादर केल्‍या.

Dhangar Community ST Status
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

‘आरजेआय’ने यापूर्वी गवळी-धनगरच्‍या अधिसूचनेची शेवटची अट घातलेली होती. त्‍यानंतर सरकारने तशी अधिसूचनाही जारी केली. त्‍यानंतर आता राष्‍ट्रीय ओबीसी आयोगाकडे अजूनही ‘धनगर’ म्‍हणूनच नोंद असल्‍याने आमचा प्रस्‍ताव नाकारल्‍याचे एसटी मंत्रालयाने म्‍हटले आहे. त्‍यामुळे तेथेही गवळी-धनगर म्‍हणून नोंद करण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत आणि दोन महिन्‍यांत आम्‍हाला न्‍याय मिळवून द्यावा, अशी मागणी आम्‍ही मुख्‍यमंत्र्यांकडे केली असल्‍याचे कवळेकर यांनी सांगितले.

राज्‍यातील धनगर समाजाला ‘एसटी’ दर्जा मिळवून देण्‍यासाठी मुख्‍यमंत्री सातत्‍याने प्रयत्‍न करत आहेत. याआधी त्‍यांनी धनगर समाजाच्‍या शिष्‍टमंडळासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्‍यानंतर गेल्‍या ५ जून रोजी त्‍यांनी एसटी मंत्रालयासही पत्र पाठवून निर्णयाचा फेरविचार करण्‍याची मागणी केली आहे. आजच्‍या बैठकीत आम्‍ही पुन्‍हा एकदा शिष्‍टमंडळासह अमित शहा आणि केंद्रीय आदिवासी कल्‍याण मंत्र्यांची शिष्‍टमंडळासह भेट घेण्‍याची मागणी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. त्‍यासाठी त्‍यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे, असेही कवळेकर यांनी नमूद केले.

Dhangar Community ST Status
CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

अमित शहा यांची भेट मिळवून द्या

बैठकीत आम्‍ही पुन्‍हा एकदा शिष्‍टमंडळासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍यासह केंद्रीय आदिवासी कल्‍याणमंत्र्यांची शिष्‍टमंडळासह भेट घेण्‍याची मागणी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. त्‍यासाठी त्‍यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे, असे बाबू कवळेकर यांनी यावेळी बोलताना स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com