Goa Dairy Milk: दुग्ध व्‍यवसायाला संबंधित खात्‍यांचे सहकार्य गरजेचे

सरकार उदासीन : अनेक वर्षे आधारभूत किंमत ‘जैसे थे’
Dairy Milk
Dairy MilkGomantak Digital Team
Published on
Updated on

नेत्रावळीसारख्या कृषीसंपन्न भागात दूध व्यवसाय करण्यास मोठी संधी आहे. परंतु पशुसंवर्धन खात्याला सरकारची अन्य खाती सहकार्य करीत नसल्याने नेत्रावळीतील युवकांना आवड असूनही या व्यवसायात उतरता येत नसल्याची खंत तेथील एक प्रगतिशील दूध उत्पादक बुंडा वरक यांनी व्यक्त केली.

पशू खाते आणि दूध उत्पादकांनी पुढाकार घेतला म्‍हणून दूध व्यवसाय वाढू शकत नाही. त्यासाठी संबंधित सरकारी खात्यांचे सहकार्य मिळणे गरजेचे असते. पदरात शिक्षण नसलेला आणि शिक्षण असलेला बेरोजगार युवक दूध व्यवसायात उतरून आपले भविष्य निर्माण करण्याची स्वप्न पाहतो. पण आवश्यक सहकार्य मिळत नसल्याने तो मागे पडतो. असे झाले तर भविष्यात हा व्यवसाय नष्‍ट होण्यास फार वेळ लागणार नसल्याचे वरक यांनी सांगितले.

Dairy Milk
Goa Traffic Rule: वाहनचालकांनो सावधान! ‘स्पीड रडार गन्स’ आजपासून ‘ॲक्टीव्ह’

संजीवनी साखर कारखान्याची जी स्थिती झाली, तशीच स्‍थिती दूध व्‍यवसायाची होऊ शकते, अशी भीतीही त्‍यांनी व्‍यक्त केली. शेतकरी दूध गोवा डेअरी देतात, पण त्‍यांना प्रोत्साहन देण्याचे सोडून मनोबल खच्चीकरण करण्याचे कार्य पद्धतशीरपणे सुरू आहे. शेतकऱ्यांना पुरविण्यात येणारे पशुखाद्य गोवा डेअरीने बंद केल्याने शेतकऱ्यांना आता राज्याबाहेरील संस्थांकडून खाद्य खरेदी करावे लागत आहे. त्यासाठी मागेल ती किंमत मोजावी लागतेय.

Dairy Milk
Goa Mining: खनिज वाहतुकीतील वर्चस्वासाठी दोन मंत्र्यांमध्ये चढाओढ, भर उन्हात वाहनचालकांनाही वेठीस धरण्याचा प्रकार

जमीन आहे, पाणी नाही

सरकारने मुख्यमंत्री कामधेनू योजना जाहीर केली होती. पण गायी-गुरांना होणाऱ्या लंपी आजारामुळे अद्याप ही योजना सुरू झालेली नाही. नेत्रावळीत पशुचिकित्सा खाते चांगली सेवा देत असले तरी त्या सेवेला पूरक अशा योजना सरकारच्या अन्य खात्यांनी द्यायला हव्‍या होत्‍या. शेतकऱ्यांनी हिरवा चारा लागवड केल्यास त्याचा जंगली जनावरे फडशा पाडतात. यासाठी कृषी खात्याच्या योजना असल्या तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना पाणी समस्या सतावतेय आणि जमीन-पाणी आहे त्यांना जंगली जनावरे सतावतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com