Dabolim Airport: दाबोळी विमानतळासाठी 255 कोटी! केंद्राकडून निधी मंजूर; विमानोड्डाणमंत्री रुडींनी दिली माहिती

Dabolim Airport funding: विमान प्रवाशांची वाढती संख्‍या लक्षात घेऊन केंद्र सरकारने गोव्‍यासह विविध राज्‍यांतील विमानतळांवरील सोयी–सुविधा वाढवण्‍याचे प्रयत्‍न गेल्‍या काही वर्षांपासून सुरू केलेले आहेत.
Dabolim Airport Runway
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील दाबोळी विमानतळाची टर्मिनल इमारत आणि इतर कामांसाठी केंद्र सरकारकडून २५५.६९ कोटींचा निधी मंजूर करण्‍यात आला असल्‍याची माहिती केंद्रीय विमानोड्डाणमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे.

विमान प्रवाशांची वाढती संख्‍या लक्षात घेऊन केंद्र सरकारने गोव्‍यासह विविध राज्‍यांतील विमानतळांवरील सोयी–सुविधा वाढवण्‍याचे प्रयत्‍न गेल्‍या काही वर्षांपासून सुरू केलेले आहेत. त्‍यासाठी देशभरातील २३ विमानतळांसाठी सुमारे १७ हजार कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे.

त्‍यात गोव्‍यातील दाबोळी विमानतळावरील टर्मिनल इमारत आणि इतर कामांसाठी २५५.६९ कोटींचा निधी मंजूर करण्‍यात आला असल्‍याचे मंत्री रुडी यांनी उत्तरातून जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

Dabolim Airport Runway
Dabolim Airport: ‘दाबोळी’ बंद करण्याचे गुदिन्होंचे प्रयत्न! विरियातोंचा आरोप; वास्कोतील उड्डाणपूल बनला कळीचा मुद्दा

दाबोळी बंद होणार नाही !

दरम्‍यान, मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळ सुरू झाल्‍यापासून दाबोळी विमानतळ बंद होण्‍याचा दावा विरोधकांकडून वारंवार केला जात आहे.

Dabolim Airport Runway
Dabolim Airport: 'मोपा'मुळे 'दाबोळी'चे भवितव्य धोक्यात; आपल्याच सरकारला मायकल लोबोंनी घेरले, लॉजिकल प्रश्नांना विरोधकांनीही दिली दाद

राज्‍याला दोन विमानतळांची गरज असल्‍यामुळे मोपा आणि दाबोळी ही दोन्‍ही विमानतळे सुरू राहतील, अशी हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेली असतानाही प्रत्‍येक विधानसभा अधिवेशनात विरोधकांकडून हा विषय उपस्‍थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्राने दाबोळी विमानतळाच्‍या विकासासाठी २५५.६९ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Girish Chodankar Tribal Sub Plan fund
Goa Blue Revolution Fund
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Dabolim Airport
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com