Goa Assembly Monsoon Session 2025
Goa Assembly Monsoon Session 2025Dainik Gomantak

Dabolim Airport: 'मोपा'मुळे 'दाबोळी'चे भवितव्य धोक्यात; आपल्याच सरकारला मायकल लोबोंनी घेरले, लॉजिकल प्रश्नांना विरोधकांनीही दिली दाद

Goa Assembly Monsoon Session 2025: भाजप आमदार मायकल लोबो यांनी दाबोळीवरुन मोपावर स्थालंतर होणाऱ्या फ्लाईट्चा मुद्दा उपस्थित करत आपल्याच सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
Published on

पणजी: दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी भाजप आमदार मायकल लोबो यांनी दाबोळीवरुन मोपावर स्थालंतर होणाऱ्या फ्लाईट्चा मुद्दा उपस्थित करत आपल्याच सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा धारदार सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे दाबोळीहून थेट मोपाकडे वळवली जात आहेत. परिणामी दाबोळी विमानतळावरील उड्डाणांची संख्या झपाट्याने घटली असून, त्यामुळे स्थानिकांना आणि पर्यटकांना याचा फटका बसू शकतो,” असा इशारा लोबो यांनी यावेळी बोलताना दिला. मोपा विमानतळ सुरु करताना राज्यात दोन्ही विमानतळ सुरु राहू शकतील का? याचा अभ्यास करण्यात आला नव्हता का? असा प्रश्न त्यांनी सरकाला विचारला.

Goa Assembly Monsoon Session 2025
Goa Assembly: 4119 प्रश्‍न, सरकारी आणि खासगी विधेयके; पावसाळी अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

मायकल यांच्या रास्त आणि लॉजिकल प्रश्नांना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील दाद दिली. मोपावर विमाने वळवली जात असल्याचे दाखले यावेळी लोबोंनी सभागृहात दिले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या दाव्याला उत्तर देताना स्पष्ट केले की, "दाबोळी विमानतळ बंद होणार नाही. सध्या गोव्यातील दोन्ही विमानतळांवर मिळून दररोज ५० ते ५१ विमाने ये - जा करत आहेत. दाबोळी विमानतळ पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे आणि भविष्यात त्यावरून अधिक कंपन्यांची उड्डाणे होतील," असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.

याचवेळी मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी बोलताना मोपा विमानतळ खासगी कंपनीकडे असले तरी यातून सरकारला उत्पन्न मिळत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले. "मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे ६५ कोटी रुपयांचा महसूल मिळालेला आहे. तसेच, केंद्र सरकारने दाबोळी विमानतळासाठी अनुदान वाढवले असून, दोन्ही विमानतळ कार्यरत राहतील," असे त्यांनी स्पष्ट केले.

Goa Assembly Monsoon Session 2025
Sharad Ponkshe Goa: 'राम, कृष्ण आणि छत्रपतींच्या गोष्टी मुलांना शिकवा'! पालक व मुले विषयावर शरद पोंक्षे यांचे सडेतोड भाष्य

उत्तरेत मोपा विमानतळ सुरु झाल्याने दक्षिणेतील दाबोळी विमानतळ घोस्ट होणार की काय? अशी भिती सातत्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार उपस्थित करत आहेत. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी वारंवार दाबोळी सुरु राहील असे आश्वासन सभागृहात दिले असले तरी गेल्या काही दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी दोबाळीवरुन मोपावर कामकाज वळवल्याने अनेकांना वाटत असलेली भिती रास्त असल्याची शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा याबाबत मुख्यमंत्री दाबोळीबाबत सभागृहाला आश्वासत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com