Dabolim Airport: ‘दाबोळी’ बंद करण्याचे गुदिन्होंचे प्रयत्न! विरियातोंचा आरोप; वास्कोतील उड्डाणपूल बनला कळीचा मुद्दा

Mauvin Godinho vs Viriato Fernandes: दाबोळी-बोगमाळो चौक ते एमईएस चौक दरम्यान बांधण्यात येणारा उड्डाण पूल पंचायत मंत्री माविन गुदिन्हो व काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासाठी कळीचा मुद्दा बनला आहे.
Viriato Fernandes
Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी-बोगमाळो चौक ते एमईएस चौक दरम्यान बांधण्यात येणारा उड्डाण पूल पंचायत मंत्री माविन गुदिन्हो व काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासाठी कळीचा मुद्दा बनला आहे.

या दोघांमध्ये सदर उड्डाण पुलावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सदर उड्डाण पुल कोणत्या कारणासाठी बांधण्यात येत आहे,यासंबंधी मंत्री गुदिन्हो व खासदार कॅ. फर्नांडिस आपल्यापरीने बाजू मांडत आहेत.

दाबोळी विमानतळ बंद करण्यासाठी मंत्री गुदिन्हांचे प्रयत्न चालू आहेत, असा आरोप कॅप्टन विरियातो फर्नांडिस करीत आहेत. तर दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, तर त्याचा विस्तारही होणार असल्याचे मंत्री गुदिन्हो स्पष्ट केले.

Viriato Fernandes
Dabolim Airport: 'मोपा'मुळे 'दाबोळी'चे भवितव्य धोक्यात; आपल्याच सरकारला मायकल लोबोंनी घेरले, लॉजिकल प्रश्नांना विरोधकांनीही दिली दाद

मंत्री गुदिन्हो यांनी तीन चार दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात उड्डाण पुलावर भाष्य करताना, विरोधकांनी अडथळे आणल्याने उड्डाण पूल तयार होण्यास विलंब लागत आहे. नाही तर आतापर्यंत ८०टक्के काम पूर्ण झाले असते, असा दावा त्यांनी केला होता.

Viriato Fernandes
Dabolim: ‘दाबोळी’ विमानतळ परिसरात वाहतुकीचे तीनतेरा! 20 दिवसांत दोघांचा बळी, रस्ता ओलांडणे बनले जीवघेणे

यावर पलटवार करून कॅ. फर्नांडिस यांनी त्या उड्डाण पुलासंबंधी मंत्री गुदिन्हो दिशाभूल करत असल्याचा दावा केला. मंत्री कधी सांगतात की, विमानतळाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी या पुलाचा वापर होणार आहे, तर कधी मुरगाव बंदरातील अवजड वाहनांसाठी हा पूल वापरणार असे सांगतात, असे ते म्हणाले.

न्यायालयीन आदेशानुसार सुमारे १७ खांबांची उंची कमी करण्यासाठी ते कापण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदर उड्डाण पूल बांधण्यापूर्वी नौदलाची परवानगी घेतली नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे ते संबंधित अधिकारी त्रासात पडणार आहेत. आम्ही त्या अधिकाऱ्यांमागे लागणार आहोत.

विरियातो फर्नांडिस, खासदार

कॅप्टन फर्नांडिस हे फक्त नकरात्मकता पसरवितात, विकासकामांशी त्याचे वाकडे आहे. त्या उड्डाण पुलाच्या उंचीबाबत न्यायालयात गेल्यावर काही खांब कापावे लागलेत. यामुळे लोकांचा पैसा वाया गेला याला जबाबदार कॅप्टन फर्नांडिस व विरोध करणारे आहेत. दाबोळी विमानतळ कधीच बंद होणार नाही.

माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com