Dabolim Airport: ‘दाबोळी’वर बाॅम्ब असल्याचा फोन!

सुरक्षा यंत्रणेची तारांबळ ः काही तासांत पेडण्यातील एकास अटक
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport वास्को- दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाॅम्ब ठेवल्याचा फोन नियंत्रण कक्षात येताच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. निनावी आलेला हा फोन कोणी केला याची नंतर चौकशी करण्यात आली व या प्रकरणी पेडण्यातील एका मजुरास ताब्यात घेण्यात आले.

Dabolim Airport
CM Pramod Sawant: रोबोटिक शिक्षणात गोवा अव्वलस्थानी मात्र शैक्षणिक धोरणासाठी शिक्षक-पालकांचा सहभाग महत्त्वाचा

दाबोळी विमानतळावर बाँब ठेवल्याचा फोन आल्यानंतर पोलिस, बाँब निकामी पथक, श्वानपथक व अग्निशमन दलाने त्वरित विमानतळावर जाऊन शोध कार्य सुरू केले, परंतु कुठेच बाँब किंवा कोणतीही बाँबसदृश वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे फोन करणाऱ्याचा शोध घेण्यात आला व उशिरा त्याला मोपा येथून ताब्यात घेण्यात आले.

Dabolim Airport
Kaju Feni : काजू फेणीला आता जपानी बाजारपेठेचे वेध, शासकीय पातळीवर प्रयत्‍न सुरू

‘तो’ निघाला मजूर!

गोवा पोलीस नियंत्रण कक्षाला बेनावी फोन केल्याप्रकरणी मोपा पोलीसांनी पेडणे येथील संशयित कुंदन कुमार या 22 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची पडताळणी सुरू केली असता त्याचे लोकेशन मोपा विमानतळ परिसर मिळाले.

त्यानुसार मोपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक निनाद देउलकर यांनी तपास सुरू केला. तपासाअंती, संशयित मजूर असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com