Kaju Feni : काजू फेणीला आता जपानी बाजारपेठेचे वेध, शासकीय पातळीवर प्रयत्‍न सुरू

सरकारचे प्रयत्न ः अधिकारी-उद्योजकांचे शिष्‍टमंडळ लवकरच जपानच्या दौऱ्यावर
Kaju Feni
Kaju FeniDainik Gomantak
Published on
Updated on

Kaju Feni गोव्‍याचे ‘हेरिटेज ड्रिंक’ अशी मान्‍यता मिळालेल्‍या गोव्‍यातील काजू फेणीने युरोप आणि अमेरिकेत आपली जागा यापूर्वीच तयार केलेली आहे. आता या फेणीला जपानी बाजारपेठेचे वेध लागले असून गोव्‍यातील या पारंपरिक मद्याचा जपानात प्रचार करण्‍यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्‍न सुरू झाले आहेत.

शासकीय अधिकारी आणि उद्योजकांचे एक शिष्‍टमंडळ यासाठी लवकरच जपानच्‍या दौऱ्यावर जाणार आहे. अखिल गोवा काजू फेणी उत्‍पादक संघटनेचे अध्‍यक्ष गुरुदत्त भक्‍ता यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जपान ही गोव्‍याच्‍या फेणीसाठी चांगली बाजारपेठ होऊ शकते.

याचे कारण सांगताना ते पुढे म्‍हणाले, की खनिज व्‍यवसायामुळे जपान आणि गोवा यांचे एक चांगले व्‍यावसायिक नाते यापूर्वीच तयार झालेले असून जपानी व्‍यावसायिकांत गोव्‍याबद्दल आपुलकी आहे.

दुसरी गोष्‍ट अशी की, जपानी ग्राहक हँडक्राफ्‍टेड (मशिन न वापरता बनविलेल्‍या) वस्‍तूंचा चाहता असून गोव्‍यातील पारंपरिक पद्धतीने बनविलेली फेणी त्‍यांना निश्चितच आवडू शकते. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे जपानी ग्राहक हा चांगल्‍या वस्‍तूसाठी घसघशीत पैसे मोजणारा आहे. यामुळेच गोव्‍यातील फेणीला जपान पोषक बाजारपेठ होऊ शकते.

‘हेरिटेज ड्रिंक’चा दर्जा

गोव्‍याच्‍या फेणीला यापूर्वीच ‘जीआय टॅग’ मिळाला असून गोवा सरकारने फेणीला राष्‍ट्रीय तसेच आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत स्‍थान मिळावे यासाठी ‘कंट्री लिकर’ या श्रेणीतून बाहेर काढून ‘हेरिटेज ड्रिंक’ या श्रेणीत आणले आहे.

यामुळे फेणीची बाजारपेठ विस्‍तारण्‍याची शक्‍यता आहे, पण या फेणीला ‘हेरिटेज ड्रिंक’चा दर्जा मिळाल्याचा संदेश ज्‍या पद्धतीने इतर राज्यांत पोचला पाहिजे तसा अजूनही पोचलेला नाही. त्‍यामुळे या मद्याचा प्रसार करण्‍यात अडचणी येतात, अशी खंत उत्‍पादक संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी व्‍यक्‍त केली.

Kaju Feni
CM Pramod Sawant: रोबोटिक शिक्षणात गोवा अव्वलस्थानी मात्र शैक्षणिक धोरणासाठी शिक्षक-पालकांचा सहभाग महत्त्वाचा

सरकारची तत्त्वतः मान्यता :

काजू फेणी जपानमध्ये नेण्याचा उत्‍पादकांचा प्रस्‍ताव अबकारी संचालकांनी सरकारसमाेर मांडला असून सरकारने त्‍याला तत्त्वतः मान्‍यता दिली आहे. हे शिष्‍टमंडळ जपानमध्ये जाऊन जपानी बाजारपेठेचा अभ्‍यास करणार आहे आणि तेथील औद्योगिक प्रतिनिधींची भेट घेऊन गोव्याच्या फेणीबद्दल माहिती देणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com