CM Pramod Sawant: रोबोटिक शिक्षणात गोवा अव्वलस्थानी मात्र शैक्षणिक धोरणासाठी शिक्षक-पालकांचा सहभाग महत्त्वाचा

मुख्यमंत्री ः नवीन शिक्षण धोरणाचा वर्धापनदिन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची सर्व पातळीवर अंमलबजावणी करण्यात गोवा देशात क्रमांक एकवर आहे. याच शिक्षणप्रणालीत आधुनिक व अत्याधुनिक पध्दतीचे प्रयोग करताना रोबोटिक शिक्षणाचा अवलंब करून तो यशस्वीपणे पुढे नेणारे गोवा हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.

अखिल भारतीय शिक्षा संगमच्या गोवा विभागातर्फे साखळी रवींद्र भवनात केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

CM Pramod Sawant
Tiger Reserve: पंतप्रधानांनी म्हादई अभयारण्याबाबत केलीय 'ही' घोषणा, गोव्यातील वाघांची संख्याही केली जाहीर

यावेळी व्यासपीठावर शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, साखळीच्या नगराध्यक्ष रश्मी देसाई, संचालक शैलेश झिंगडे, मनोज सावईकर उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार जरी उत्सुक असले, तरी त्यात शिक्षकांचा व पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली.

CM Pramod Sawant
Vishwajit Rane: मंत्री राणेंकडून वन खाते काढून घ्‍या - ‘सेव्‍ह गोवा-सेव्‍ह टायगर’ ची मागणी

मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे’

शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे हे आमचे धोरण आहे. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे संस्कारक्षम व सर्व दृष्टीने परिपूर्ण पिढी तयार करण्यासाठी या धोरणाची अंमलबजावणी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय पातळीवर करण्यात येत आहे. त्यासाठी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतही बरेच बदल घडवून आणले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com