Mapusa Cylinder Blast Video: म्हापसा येथील हिलटॉप बारमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, 2 लाखांचे नुकसान

फ्लॅट आणि काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mapusa Cylinder Blast
Mapusa Cylinder Blast Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा येथील हिलटॉप बारमध्ये सिलिंडरच्या स्फोट झाला आहे. डांगी कॉलनीत आज (रविवारी) पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी म्हापसा अग्निशमन दालाचे जवान दाखल झाले व बचावकार्य केले. (Cylinder Blast In Mapusa Hilltop Bar)

स्फोटाचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. बारमालकाने याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तर, काही जणांनी गॅस गळतीमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान या स्फोटात दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

Mapusa Cylinder Blast
Goa Tourism: 'गोवा सरकार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनावर भर देणार'- प्रमोद सावंत

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा अग्निशमन दालाला पहाटे डांगी कॉलनी म्हापसा येथे हिलटॉप बारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घनास्थळी दाखल झाले व बचावकार्य सुरू केले. स्फोटात बारचे नुकसान झाले असून बारच्या शेजारील फ्लॅट आणि काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मागील तीस वर्षांपासून हा बार सुरू असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. सिलिंडरच्या स्फोटामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली असून, बारमालकाने याची पोलिस चौकशी करण्याची मागणी केली आहे.

फ्लॅटच्या भिंती, किचन कोसळले

पहाटे झालेला हा स्फोट एवढा भीषण होता की यात शेजारील फ्लॅटच्या भींती कोसळल्या आहेत शिवाय काही लोकांच्या घरातील किचनचे नुकसान झाले आहे. याशिवाय चारचाकी आणि दुचाकींचे देखील नुकसान झाले आहे.

Mapusa Cylinder Blast
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नाबाबत गोव्यानंतर आता महाराष्ट्रही आक्रमक

धुळेर- म्हापसा येथे दोन दुचाकींची टक्कर

दरम्यान, म्हापसा येथून अजून एक अपघाताची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास म्हापसा धुळेर येथे दोन दुचाकींची धडक झाली. या घटनेत एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला इस्पितळात दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com