Goa Tourism: 'गोवा सरकार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनावर भर देणार'- प्रमोद सावंत

लवकरच पेडणे ते काणकोणदरम्यान गोमंतकीय तसेच पर्यटकांसाठी पर्यटन दौऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
temples |Goa Tourism
temples |Goa Tourism
Published on
Updated on

Goa Tourism: मोपा विमानतळासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, मोपावर गोमंतकीयांना रोजगार दिला नाही, असे काही लोक बोलतात, ते चुकीचे आहे. मी प्रत्यक्ष तिथे जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. तेथे 95 टक्के कर्मचारीवर्ग पेडणे व गोव्याच्या इतर भागातील असल्याचे समजले. समाज कल्याण खात्यातर्फे अनेक योजना सुरू आहेत.

कालांतराने आणखी योजना सुरू केल्या जातील, असेही ते म्हणाले. राज्य सरकार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनावर भर देणार असून लवकरच पेडणे ते काणकोणदरम्यान गोमंतकीय तसेच पर्यटकांसाठी पर्यटन दौऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

temples |Goa Tourism
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ घट, जाणून घ्या आजचे दर

या दौऱ्यात पर्यटकांना गोव्यातील पर्यटनस्थळे, जी कदंब काळापासून अस्तित्वात आहेत, अशा मंदिर, पर्यटन स्थळांवर पर्यटकांना नेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

काल राज्यातील भाविकांसाठी शिर्डी यात्रा सुरू झाली. या भाविकांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री मडगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

सध्या मुख्यमंत्री देवदर्शन योजनेअंतर्गत शिर्डी आणि तिरुपती दर्शन यात्रा सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे सहा हजार भाविकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यापुढे वाराणसी, काशी व अयोध्या येथेही देवदर्शन यात्रा सुरू करण्यात येईल.

तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना लवकरच तीन गॅस सिलिंडर्स मोफत देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, सरकारचा लोकसंपर्क चांगला असल्याने सरकारी योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हादईप्रश्नी ते म्हणाले की, सरकार हा प्रश्र्न व्यवस्थितरित्या सोडवेल. लोकांचा सरकारवर पूर्ण विश्र्वास असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आणि समाज कल्याण खात्याच्या संचालक संध्या कामत उपस्थित होत्या.

विमान प्रवाशांसाठी खास रेल्वे

सध्या कदंब महामंडळाने मोपा ते मडगाव, पणजी, म्हापसा व कळंगुट या मार्गांवर विमान प्रवाशांसाठी बससेवा सुरू केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून पेडणे ते काणकोण मार्गावर ज्यादा प्रवासी रेल्वे सुरू करण्यात येतील. त्यामुळे विमान प्रवाशांची चांगली सोय होईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

temples |Goa Tourism
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नाबाबत गोव्यानंतर आता महाराष्ट्रही आक्रमक

95%गोमंतकीय

मोपा विमानतळासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, मोपावर गोमंतकीयांना रोजगार दिला नाही, असे काही लोक बोलतात, ते चुकीचे आहे. मी प्रत्यक्ष तिथे जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे.

तेथे 95 टक्के कर्मचारीवर्ग पेडणे व गोव्याच्या इतर भागातील असल्याचे समजले. समाज कल्याण खात्यातर्फे अनेक योजना सुरू आहेत. कालांतराने आणखी योजना सुरू केल्या जातील, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com