Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नाबाबत गोव्यानंतर आता महाराष्ट्रही आक्रमक

म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विर्डी गावातील वाळवंटी नदीचा प्रवाहही आटणार आहे.
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विर्डी गावातील वाळवंटी नदीचा प्रवाहही आटणार आहे. याविरोधात आता गोव्यापाठोपाठ विर्डी गावानेही आज ‘एल्गार’ पुकारला आहे.

कर्नाटक गोव्याच्या दिशेने येणाऱ्या म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा प्रकार करत आहे. त्याने फक्त गोव्याला त्रास होणार नसून त्याची सुरुवात दोडामार्ग तालुक्यामधील विर्डीपासून होणार आहे. तेथील वाळवंटी नदीचा प्रवाह बंद होणार असून विर्डी गावावर जलसंकट ओढवणार आहे.

त्यामुळे विर्डीचा आवाज बनण्यासाठी दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्गवासीयांनी साथ द्यावी, असे आवाहन विर्डीचे उपसरपंच एकनाथ गवस यांनी केले आहे.

कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित सादर केलेल्या डीपीआरला केंद्रीय जलतंटा लवादाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी तेथील सरकारी यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. कर्नाटकात भाजपसह आता कॉंग्रेेसनेही दंड थोपटले आहेत. मात्र, गोेव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी एक आठवड्यानंतर बैठक घेऊ, असे सांगून उदासीनता दर्शविली आहे.

जगदीश शेट्टर म्हणतात, गोव्याची बाजू कमकुवत!

कर्नाटकात कळसा-भांडुरा प्रकल्पाचा मुद्दा राजकीय असला तरी तेथे गेल्या काही दिवसांपासून त्यावर तेथील नेते सावधपणे आपले मत मांडत आहेत. गोव्याचे मनोबल कमी करण्यासाठीच शनिवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते जगदीश शेट्टर यांनी शनिवारी म्हादईप्रश्‍नी गोव्याची बाजू कमकुवत झाल्याचे विधान केले आहे.

यापूर्वीही कर्नाटकातील अनेक नेत्यांनी गोव्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदर कर्नाटकही कळसा-भांडुरा प्रकल्पाविषयी गोव्यातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे, हे स्पष्ट आहे.

Mahadayi Water Dispute
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ घट, जाणून घ्या आजचे दर

सभागृह समितीची सोमवारी बैठक

म्हादईप्रश्र्नी कृती ठरविण्यास सभागृह समितीची बैठक पुढील आठवड्यात सोमवारी घेतली जाईल, असे जलस्त्रोतमंत्री तथा या समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी आज सांगितले. मडगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

या बैठकीत पुढील कामाची रूपरेषा ठरविण्यात येईल. ही समिती गठीत केल्याने म्हादईचा प्रश्र्न सोडविण्यास त्याचा फायदाच होईल, असेही शिरोडकर यांनी नमूद केले आहे.

आंदोलन शमविण्यासाठीच सभागृह समिती

म्हादईविरोधातील आंदोलन पेटू लागले आहे. त्याचा भडका उडू नये, यासाठीच राज्य सरकारने सभागृह समिती स्‍थापन करून हा विषय शीतपेटीत टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

सभागृह समितीमध्ये हा विषय येईल. तोपर्यंत कर्नाटकातील विधानसभा निवडणुकाही होतील. कर्नाटकात भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास म्हादईचे पाणी वळविले जाईल हे निश्‍चित. मग ते आम्हाला ‘न्यायालयात जा ’, असे सांगतील, असे सरदेसाई म्हणाले.मविण्यासाठीच सभागृह समिती

म्हादईविरोधातील आंदोलन पेटू लागले आहे. त्याचा भडका उडू नये, यासाठीच राज्य सरकारने सभागृह समिती स्‍थापन करून हा विषय शीतपेटीत टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

सभागृह समितीमध्ये हा विषय येईल. तोपर्यंत कर्नाटकातील विधानसभा निवडणुकाही होतील. कर्नाटकात भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास म्हादईचे पाणी वळविले जाईल हे निश्‍चित. मग ते आम्हाला ‘न्यायालयात जा ’, असे सांगतील, असे सरदेसाई म्हणाले.

Mahadayi Water Dispute
Coal Transportation: कोळसा हाताळणी उद्योगांना प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना लागू करणार : गुदिन्हो

वझरा सकला धबधब्यावरही संकट-

कर्नाटक सरकार गोव्याच्या दिशेने येणारा पाणी प्रवाह रोखत आहे. याचा दुष्पपरिणाम विर्डीवर होणार आहे. येथील वझरा सकला नदीपासून ते वाळवंटी नदीचा प्रवास संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे वझरा सकला धबधबा बंद होऊ शकतो. तसेच विर्डी गावातील पाण्याची पातळी घटणार आहे.

बागायतींनाही धोका आहे. हे लक्षात घेऊन गोवा सरकारला पाठिंबा देण्यासाठी आणि विर्डी गाव वाचविण्यासाठी आवाज उठवला जाईल. सुरुवातीला गावातून सह्यांची मोहीम राबविली जाईल, अशी माहिती विर्डीचे उपसरपंच एकनाथ गवस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com