व्हॉट्सॲप कॉल अन् CBI ची धमकी! 90.85 लाख उकळणारा केरळचा 21 वर्षीय भामटा जेरबंद; गोवा पोलिसांकडून 'डिजिटल अरेस्ट'चा पर्दाफाश

Kerala Youth Arrested for Cyber Scam: गोवा पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट' सारख्या गंभीर सायबर फसवणुकीच्या एका प्रकरणात मोठी कारवाई केली.
Cyber Fraud Case Goa
Kerala Youth Arrested for Cyber ScamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट' सारख्या गंभीर सायबर फसवणुकीच्या एका प्रकरणात मोठी कारवाई केली. 90.85 लाखांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी केरळच्या 21 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असलेल्या एका मोठ्या सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला. आरोपीने सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट रुप धारण करुन तक्रारदाराला मानसिक दडपणाखाली आणले आणि त्याच्याकडून मोठी रोकड उकळली. सध्या या प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपीने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला होता. स्वतःची ओळख भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे अधिकारी म्हणून करुन दिली. आरोपीने तक्रारदाराला धमकी दिली की त्याच्या नावावर काही बेकायदेशीर व्यवहार झाले असून त्याला 'डिजिटल अरेस्ट' केले जात आहे.

कायदेशीर कारवाई आणि अटकेच्या या खोट्या भीतीमुळे तक्रारदार प्रचंड घाबरला आणि त्याने आरोपीने (Accused) सांगितलेल्या बँक खात्यात तब्बल 90.85 लाख ट्रान्सफर केले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने गोवा पोलिसांकडे धाव घेतली, ज्यानंतर तांत्रिक विश्लेषण करुन पोलिसांनी या तरुणाच्या मुसक्या आवळल्या.

Cyber Fraud Case Goa
Cyber Fraud: गुंतवणुकीच्या नावाखाली गोमंतकीयाला 1.64 कोटींचा गंडा; फरिदाबादच्या भामट्याला अटक, गोवा सायबर सेलची हरियाणात कारवाई

तपासादरम्यान असे धक्कादायक वास्तव समोर आले की, फसवणुकीच्या या रकमेपैकी 5 लाख रुपये थेट अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणाच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर ही रक्कम त्याने आपल्या इतर साथीदारांच्या विविध खात्यांमध्ये वळवली होती. पोलिसांनी जेव्हा या खात्याचे सखोल विश्लेषण केले, तेव्हा हे स्पष्ट झाले की हे खाते केवळ एकाच गुन्ह्यासाठी वापरले गेले नव्हते. या खात्याचे धागेदोरे कर्नाटक आणि गोव्यातील इतर दोन मोठ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांशी जुळलेले आहेत. या सर्व प्रकरणांची एकत्रित व्याप्ती 2.10 कोटींच्या घरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Cyber Fraud Case Goa
Goa Cyber Crime: गुंतवणूकीतून ज्यादा परताव्याचं आमिष, गोव्यातील एकाला 67 लाखांचा गंडा; केरळच्या भामट्याला बेड्या

सध्या या 21 वर्षीय आरोपीची चौकशी सुरु असून या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हे पैसे नेमके कुठे वळवण्यात आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. कोणतीही सरकारी यंत्रणा किंवा तपास संस्था अशा प्रकारे व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सॲपवरुन (WhatsApp) कुणालाही 'डिजिटल अरेस्ट' करत नाही. अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरुन न जाता तातडीने 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी. या प्रकरणातील पुढील तपास गोवा सायबर गुन्हे विभागाकडून सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com