Goa Cyber Crime: गोव्यात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार 2020 ते 2022 या काळात गोव्यात एकूण 166 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली.
2020 मध्ये एकूण 40, सन 2021 मध्ये 36 आणि सन 2022 मध्ये 90 गुन्ह्यांची नोंद झाली होती. सन 2020 नंतर राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ ही तब्बल 300 टक्के इतकी आहे.
गोवा पोलिसांनी या कालावधीत एकूण 98 जणांना अटक केली आहे. 166 प्रकरणांपैकी केवळ 39 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असेही एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.
ब्यूरोने म्हटले आहे की 2021 ते 2022 या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलेले नाही.
द सिटिझन सायबर फ्रॉड्स रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टम ही यंत्रणा राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलचा एक भाग म्हणून विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) दिली.
“हे मॉड्यूल एक एकीकृत प्लॅटफॉर्म प्रदान करते, जिथे राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सी, सर्व प्रमुख बँका आणि आर्थिक मध्यस्थ, पेमेंट वॉलेट, क्रिप्टो एक्सचेंज आणि ई-कॉमर्स कंपन्या यासह सर्व भागधारक असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.