Goa: सर्वण बस थांब्यावर अखेर बसविला 'व्ह्यू मिरर'

कारापूर-सर्वणचे सरपंच गोकुळदास सावंत यांनी या जंक्शनवर 'कॉन्व्हेक्स व्हीव्ह मिरर' ('Convex View Mirror') (बहिर्गोल दृष्य आरसा) बसविलेला आहे.
डिचोली-साखळी जंक्शनवर 'कॉन्व्हेक्स व्हीव्ह' सुरक्षित वाहतुकीसाठी सरपंचांकडून व्यवस्था
डिचोली-साखळी जंक्शनवर 'कॉन्व्हेक्स व्हीव्ह' सुरक्षित वाहतुकीसाठी सरपंचांकडून व्यवस्था Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : डिचोली-साखळी (Bicholim-Sakhaḷi) मुख्य रस्त्यावरील (Road) सर्वण बस (Sarvaṇa Bus Stop) थांब्यावरील धोकादायक जंक्शनवर अखेर सुरक्षेची उपाययोजना करण्यात आल्याने वाहनचालकांत समाधान व्यक्त होत आहे. सर्वण गावातील अंतर्गत रस्ता जोडलेल्या डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावरील हे जंक्शन वाहतुकीस सुरक्षित नव्हते. बऱ्याचदा या जंक्शनवर वाहनचालकांचा गोंधळ उडत असे. यापूर्वी किरकोळ अपघातही घडलेले आहेत. ही समस्या लक्षात घेवून कारापूर-सर्वणचे सरपंच गोकुळदास सावंत यांनी या जंक्शनवर 'कॉन्व्हेक्स व्हीव्ह मिरर' ('Convex View Mirror') (बहिर्गोल दृष्य आरसा) बसविलेला आहे. तसेच सर्वण रस्त्यावर दिशादर्शक फलकांचीही व्यवस्था केली आहे.

डिचोली-साखळी जंक्शनवर 'कॉन्व्हेक्स व्हीव्ह' सुरक्षित वाहतुकीसाठी सरपंचांकडून व्यवस्था
Goa: 'दर्या देगेर' गाण्याच्या व्हिडिओला लाभतो  उत्तम प्रतिसाद

सरपंच सावंत यांच्याच हस्ते कॉन्व्हेक्स व्हीव्ह मिरर आणि फलक उभारण्यात आले आहेत. यावेळी सरपंच सावंत यांच्यासह मये भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सीताराम सावंत, नकुळ धावस्कर, संतोष सावंत, तुळशीदास सावंत, गौरीश सावंत आणि विष्णू मांद्रेकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com