Teacher's Day In Curchorem शिक्षण मिळवावे पण नुसतेच साक्षर बनण्यासाठी नव्हे, तर सृष्टीतील परम तत्त्व जाणण्यासाठी घ्यावे. आपले जगणे व्यापक बनविणे, आत्मसाक्षात्कार साधणे, संवेदनशील, चिंतनशील होणे हीच शिक्षणाची उद्दिष्टे होय, असे प्रतिपादन कुजिरा, बांबोळी येथील एस. एस. धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी केले.
कुडचडे सावर्डे रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने कुडचडे येथील रोटरी सभागृहात आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
यावेळी डॉ. कामत यांच्या हस्ते दी न्यू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हायस्कूलचे शिक्षक सूरज जोशी व चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सुगंधा भट तसेच तेजस्विनी नाईक व मंदा राणे यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष शांतेश सावर्डेकर, कार्यवाहक सचिव डॉ. परेश कामत, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष गौरी सावर्डेकर व सचिव अश्विनी नाईक उपस्थित होते. प्रदीप काकोडकर यांनी सूत्रसंचालन केले.
दिलीप रामपुरकर, शैलेंद्र वेळूस्कर, विद्या भट, विठ्ठलदास भट, ॲड अत्रेय काकोडकर, डॉ विष्णू शेल्डेकर, दीप्ती रामपुरकर, सरिता बांदेकर, शामल सावर्डेकर, ॲनेट, विनिधा भट, सोहल सावर्डेकर व अमोघ सावर्डेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.