Pernem Bus Stand: बसगाड्या स्थानकात न्या; नागरिकांचे उपोषण

पेडणेत उपोषण : उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे
Pernem Bus Stand
Pernem Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

Pernem Bus Stand पेडणे येथील बस स्थानकावर थांबा न घेता परस्पर महामार्गाने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील एसटी तसेच कदंब बसगाड्यांनी या बस स्थानकावर थांबा घ्यावा, या मागणीसाठी येथील नागरिकांनी गुरुवारी सरकारी संकुलाजवळ उपोषण केले. उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी भेट घेऊन आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Pernem Bus Stand
RGP Protest: आमची शेता, डोंगर भाटा आमका जाय... रिव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांचा नगर नियोजन कार्यालयात ठिय्या

सिंधुदुर्ग व महाराष्ट्रातील विविध भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या महाराष्ट्रातील एसटी व कदंब महामंडळाच्या बऱ्याच बसगाड्या पेडणे बस स्थानकात न येता प्रवाशांना महामार्गावर उतरवून परस्पर निघून जातात.

त्यामुळे बस स्थानकावर थांबणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे या बसगाड्यांना बसस्थानकावर येणे सक्तीचे करावे, अशी या आंदोलकांची मागणी होती. जगन्नाथ पंडित, चंद्रकांत जाधव, आनंद नाईक, भास्कर नारुलकर, उदय मांद्रेकर, उमेश तळवणेकर आदींनी यावेळी या समस्येकडे लक्ष वेधले.

Pernem Bus Stand
Krishna Janmashtami 2023: राज्यात दहीहंडीचा जल्लोष; मंदिरे गजबजली, विविध कार्यक्रमांची रेलचेल

दरम्यान, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. याबाबत लवकरच सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही समस्या सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com