RGP Protest: आमची शेता, डोंगर भाटा आमका जाय... रिव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांचा नगर नियोजन कार्यालयात ठिय्या

बार्देशमधील निवासी प्रकल्पाला मंजुरी न दिल्याने कार्यकर्ते आक्रमक
Revolutionary Goans Protest At Mapusa
Revolutionary Goans Protest At Mapusa Dainik Gomantak
Published on
Updated on

Revolutionary Goan Protest: बार्देश तालुक्यातील मेगा निवासी प्रकल्पासाठी तांत्रिक मंजुरी न दिल्याने तसेच तक्रारींवर कारवाई न केल्यावरून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरपीजी) वतीने म्हापशातील उप नगर नियोजकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या कार्यकत्यांनी येथेच ठिय्या मारला.

Revolutionary Goans Protest At Mapusa
Goa EV Subsidy: दुचाकीसाठी 25 हजार, चारचाकीला 1 लाख रूपये; इलेक्ट्रिक वाहनखरेदीसाठी पुन्हा मिळणार अनुदान?

यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येथे जमा झाले होते. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सर्व कार्यकर्ते हातात फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. त्या फलकांवर आमची शेता डोंगर भाटा आमका जाय, आमचे डोंगर आमका जाय, वी वॉन्ट ग्रीन गोवा, गोंय सालवार करूया... अशा घोषणा लिहिल्या होत्या.

जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असा पवित्रा आरजीपीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. आत्तापर्यंत केलेल्या तक्रारींवर काय कारवाई केली, याची विचारणा यावेळी कार्यकर्त्यांनी केली. तसेच बार्देश तालुक्यातील मेगा निवासी प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी न दिल्याने हे आंदोलन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com