Goa Tourism: क्रूझ पर्यटन हंगामाला सुरुवात, पहिले जहाज दाखल; 2 हजार पर्यटकांनी घेतले गोवा दर्शन

Goa Tourism News: या हंगामातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज सेलिब्रिटी मिलेनियम सुमारे २००० प्रवाशांसह मुरगाव बंदरात दाखल झाले.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : या हंगामातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज सेलिब्रिटी मिलेनियम सुमारे २००० प्रवाशांसह मुरगाव बंदरात दाखल झाले. कोचीहून दाखल झालेल्या या जहाजातील पर्यटकांनी गोवा दर्शत केल्यानंतर संध्याकाळी हे जहाज मुंबईला रवाना झाले.

पर्यटन अधिकाऱ्यांनी गुलाबाची फुले देऊन या पर्यटकांचे स्वागत केले. ब्रास बँडचाही समावेश होता. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. टूर ऑपरेटर्सनी या पर्यटकांसाठी गोवा दर्शन घडवणाऱ्या विविध सहलीचे पॅकेजेस ऑफर केले.

पहिल्या क्रूझ जहाजाच्या आगमनाने चांगला व्यवसाय झाल्याचे स्थानिक टूर ऑपरेटर आणि टॅक्सी युनियनने नोंदवले. याबाबत मुरगावचा राजा टुरिस्ट टॅक्सी युनियनचे उमेश मांद्रेकर यांनी सांगितले की, हंगामातील पहिल्या क्रूझ जहाजाच्या आगमनाने टॅक्सी चालकांनी चांगला व्यवसाय केला. अशा भेटी स्थानिक चालकांच्या उपजीविकेला मोठ्या प्रमाणात आधार देतात.

Goa Tourism
Tiger Reserve Goa: दोन टप्प्यांत व्याघ्र प्रकल्प साकारा! पाहणीअंती सक्षम समितीची शिफारस; 15 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

एमपीए ट्रॅफिक मॅनेजर जेरोम क्लेमेंट म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल पूर्णत्वाच्या जवळ आहे आणि एकदा कार्यान्वित झाल्यानंतर गोव्याच्या क्रूझ पर्यटन क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. सेलिब्रिटी मिलेनियमचे आगमन ही एक मजबूत सुरुवात दर्शवते आणि नवीन टर्मिनल येत असल्याने, क्रूझ पर्यटन आणखी वाढेल, असे त्यांनी नमूद केले.

४२ क्रूझ जहाजे येण्याची अपेक्षा

मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) मधील क्रूझ पर्यटन हंगाम १० सप्टेंबर रोजी पहिल्या जहाज एम्प्रेसच्या आगमनाने अधिकृतपणे सुरू झाली होती. १,६०० प्रवासी आणि ५०० क्रू मेंबर्सना घेऊन जाणारे हे जहाज २०२५-२६ हंगामाच्या पहिल्याच दिवशी गोव्यात दाखल झाले होते.

Goa Tourism
Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

एमपीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सप्टेंबर २०२५ ते जून २०२६ दरम्यान एकूण ४२ क्रूझ जहाजे बंदरावर येण्याची अपेक्षा आहे. सुमारे १३ आंतरराष्ट्रीय क्रूझ लाइनर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com