Goa Crime: सावधान! एसी सर्व्हिसिंगच्या नावाखाली लूट; उत्तर प्रदेशातील दोन भामटे मडगावात जेरबंद

AC servicing fraud Goa: एसी सर्व्हिसिंग तंत्रज्ञांचे सोंग घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या घरात शिरून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
AC Servicing Scam
AC Servicing ScamDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: घरोघरी वाढणारा एसीचा वापर आणि याच संधीचा फायदा घेत नागरिकांना लुबाडण्याचे एक नवे रॅकेट मडगाव पोलिसांनी उघडकीस आणले आहे. एसी सर्व्हिसिंग तंत्रज्ञांचे सोंग घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या घरात शिरून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे राज्यातील अशा प्रकारच्या फसवणुकीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश झाला आहे.

भामट्यांची अनोखी 'मोडस ऑपरेंडी'

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन भामटे पहिल्यांदा एखाद्या घरात जाऊन एसी सर्व्हिसिंगची गरज आहे का, अशी विचारणा करायचे. अत्यंत कमी दरात सर्व्हिसिंग करून देण्याचे आमिष दाखवून ते लोकांचा विश्वास संपादन करत.

एकदा का घरात प्रवेश मिळाला की, हे लोक एसी तपासण्याच्या बहाण्याने त्यातील 'कूलंट गॅस' मुद्दाम सोडून द्यायचे. त्यानंतर एसी नीट चालत नाहीये किंवा गॅस पूर्णपणे संपला आहे, असे सांगून घरमालकाला घाबरवून टाकायचे. एसी पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने गॅस रिफिल करणे आवश्यक आहे, असे भासवून ते ग्राहकांकडून जादा पैशांची मागणी करत असत.

कमी शुल्काचे आमिष आणि हजारो रुपयांची लूट

सुरुवातीला केवळ काही शंभर रुपयांमध्ये सर्व्हिसिंगचे काम घेणारे हे भामटे, गॅस भरण्याच्या नावाखाली थेट ३,५०० ते ४,००० रुपयांपर्यंतचे बिल बनवत असत. खरं तर, त्यांनी केवळ एसीची जुजबी स्वच्छता केलेली असायची, मात्र तांत्रिक माहिती नसलेल्या ग्राहकांना गॅस चोरीच्या या प्रकाराची भनकही लागत नसे. अशा प्रकारे मडगावसह गोव्यातील अनेक भागांत त्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

AC Servicing Scam
Goa Crime: नाक दाबले अन् जीव घेतला... डिचोलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू नव्हे, तर खूनच! आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

न्यायालयीन कारवाई आणि पोलिसांचा इशारा

मडगाव पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची सध्या मुक्तता करण्यात आली असली, तरी पोलिसांचा तपास अद्याप सुरूच आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे आणि त्यांनी राज्यातील इतर कोणत्या भागात अशा चोऱ्या केल्या आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com