Vasco Dussehra 2022: अंबाबाई मंदिरात शेकडो भाविकांनी लुटले सोने

दुर्गामातेचे आज केले विधिवत विसर्जन
Vasco News
Vasco NewsDainik Gomsntak
Published on
Updated on

वास्को: वास्कोत दसरोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी, आरत्या नंतर संध्याकाळी सोने लुटण्याच्या कार्यक्रमाने संपूर्ण नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आले.

(Vasco Many citizens celebrate Dussehra 2022 in Ambabai Temple)

Vasco News
Mormugao Municipality: ''गोवा शिपयार्डने गोव्यातील शिक्षित युवकांना नोकरी पासून वंचित ठेवले''

नवरात्रोत्सवाची धूम आज दसरोत्सव साजरा करून सोने लुटून झाल्यानंतर सांगता करण्यात आली. वास्कोतही आज सकाळपासून दसरोत्सवानिमित्त उत्साही वातावरण होते. सोशल मिडीयावर दसरोत्सवाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. तसेच प्रत्येक जण एकमेकांना भेटून शुभेच्छा देत होते. प्रत्येकजण मंदिरात जाऊन देव दर्शन घेताना दिसत होते. काहीजणांनी नवीन गाडी खरेदी केली तर काहींनी नवीन घरात घरप्रवेश केला.

Vasco News
U-17 World Cup: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फातोर्डा स्टेडियम विद्यार्थ्यांनी फुलणार

दरम्यान संध्याकाळच्या सत्रात मंदिरात सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. येथील अंबाबाई मंदिरात वर्षपद्धतीप्रमाणे सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. यात शेकडो भाविकांना सोने लुटले. नंतर आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम झाला. तसेच नवेवाडे येथे श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थानात सकाळी धार्मिक विधी झाली. संध्याकाळी विजयादशमी निमित्त बालकर्तनकार नेहा उपाध्ये यांचे किर्तन झाले.

दरम्यान नवरात्रोत्सवाप्रित्यर्थ पुजण्यात आलेल्या दुर्गादेवीचे आज नऊ दिवस पूजन केल्यानंतर विधिवत विसर्जन करण्यात आले. रात्री सर्वत्र दुर्गादेवीच्या विर्सजन मिरवणूकीची धूम सुरू होती. गुजराती, बंगाली समाजातर्फे पुजण्यात आलेल्या दुर्गादेवीचेही आज विर्सजन बॅण्डवादन, डिजेच्या तालावर करण्यात आले. रात्री उशिरा पर्यण विर्सजन मिरवणुका सुरु होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com