Goa Crime: महाराष्ट्रातील एकाची दुचाकी चोरणाऱ्यास अटक; 24 तासांत लावला छडा

फोंडा पोलिसांची कारवाई
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

Goa Crime: सध्या गोव्यात राहत असलेल्या पणू मूळच्या पंढरपूर येथील असलेल्या एकाची दुचाकी चोरल्याप्रकरणी चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी तातडीने पावले उचलत 24 तासांच्या आत चोरट्याला अटक केली आहे. सुशांत गावडे असे या प्रकरणाती संशयिताचे नाव आहे.

या प्रकरणी केतन कृष्णाजी कुलकर्णी (वय 29 वर्षे, सध्या राहणार- उसगाव तिस्क, फोंडा, गोवा) यांनी फिर्याद दिली होती. 19 ऑक्टोबर रोजी त्यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दिली होती .ते मूळचे पिराची कुरोली, पंढरपूर, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत.

Goa Crime
रूचकर गोव्याचा 'मिस्टर कुरकरीत!'

19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटरसायकल हीरो स्प्लेंडर प्लस Xtec (MH-13-ED-6692) चोरीला गेली होती. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे माग काढला. पाळत ठेऊन एका संशयिताची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानुसार सुशांत गावडे (वय 24 वर्षे रा. घर क्रमांक 39 नानूस उसगाव फोंडा गोवा) याला अटक केली.

Goa Crime
37th National Games मुळे पणजीतील वाहतूक मार्गात काही बदल; डीबी रोडवर वाहनांना प्रतिबंध

पिल्ले धारबांदोरा येथून मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सुशांत गावडेला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया, फोंड्याचे एसडीपीओ आशिष शिरोडकर, फोंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल केशव सिनारी, शिवाजी चव्हाण, अक्षय गावकर यांनी तपास आणि अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com