37th National Games मुळे पणजीतील वाहतूक मार्गात काही बदल; डीबी रोडवर वाहनांना प्रतिबंध

22 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
37th National Games
37th National Games Dainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस गुरूवारपासून गोव्यात औपचारीक प्रारंभ झाला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 26 ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणार आहे.

तर ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेमुळे राजधानी पणजीती वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. 22 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या काळात हे बदल लागू असतील.

या दरम्यान, पणजीतील दयानंद बांदोडकर मार्ग (डीबी रोड) वर सर्वसामान्य वाहतूकदारांना वाहतुकीस प्रतिबंध असणार आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन गोव्याच्या वाहतूक पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

37th National Games
Goa Accident: डिचोलीत दोन दुचाकींचा भीषण अपघात; वीज खात्यातील कर्मचाऱ्याचा मृत्यू....

डीबी रोडवरून काम्पाल येथील इनडूअर स्टेडियम आणि स्पोर्ट्स व्हिलेज येथे जाण्यासाठी खेळाडू, अधिकारी, प्रेक्षक यांची गैरसोय होऊ नये, त्यांना इव्हेंटस्थळी तत्काळ पोहचता यावे, या हेतूने हे बदल करण्यात आले आहेत.

असा आहे पर्यायी मार्ग

वाहनधारकांनी अंतर्गत मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. कला अकादमी जंक्शन- सांत इनेज - फायर फोर्स मुख्यालय - टोंका आणि तिथून पुढे असा हा मार्ग असेल.

37th National Games
अखेर IIT Goa साठी राज्य सरकारने जागा केली फिक्स; पणजीपासून 80 किलोमीटरवर उभारणार कॅम्पस

प्रेक्षकांसाठी पार्किंग व्यवस्था

हे खेळ पाहायला येणाऱ्या क्रीडा प्रेक्षकांसाठी डीबी फूटबॉल ग्राऊंड आणि कला अकादमीचे पार्किंग येथे गाड्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

केवळ याच वाहनांना प्रवेश

दरम्यान, ज्या वाहनांना वैध पास देण्यात आलेले आहेत. केवळ त्याच वाहनांना कांपाल इनडूअर स्टेडियम परिसरात आणि कांपाल येथील स्पोर्ट्स व्हिलेज येथे प्रवेश दिला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com