आई विदेशात, बसचालक बापाकडून दिव्यांंग मुलीवर अतिप्रसंग; अत्याचाराच्या तीन घटनांनी गोवा हादरला

राज्यात गुरुवारी उघडकीस आलेल्या तीन लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून नात्यातीलच लोकांनी हे कुकृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
Goa Crime News
Goa Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गुरुवारी उघडकीस आलेल्या तीन लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून नात्यातीलच लोकांनी हे कुकृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील एका बापानेच आपल्या दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे या भागात खळबळ उडाली आहे. तक्रार नोंद होताच पोलिसांनी त्या नराधम बापाला अटक केली आहे.

पीडिता 21 वर्षीय दिव्यांग आहे. तिच्यावर केव्हा लैंगिक अत्याचार झाला, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंदवला आहे. तिचा बाप 47 वर्षांचा असून, तो बसचालक म्हणून काम करतो.

पीडित मुलीची आई विदेशात काम करते. जुलैपूर्वी संशयिताने पीडितेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. त्याने सलग चार वेळा बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. तिने नकार दिल्यास संशयित मारबडवही करत होता, असे पीडितेने म्हटले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वास्को : ‌‌‌‌बिर्ला-झुआरीनगर येथे बुधवारी अल्पवयीन (वय १४ वर्षे) मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. पीडित मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला असता वडिलांनी वेर्णा पोलिस स्थानकात बुधवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी झुआरीनगर येथील लक्ष्मण लमाणी (वय ३३ वर्षे) याला अटक केली आहे. पोलिसांनी लमाणी याच्यावर भादंसं कलम ३६३,३७६,३५४ ए,५०६, गोवा बाल अधिनियम कलम ८ (२) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४,६,८ आणि १२ नुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.

Goa Crime News
CM Pramod Sawant: 'हॅलो गोयंकार' कार्यक्रम पाहा! नागरीकांच्या तक्रारींचे निरसन करून 15 दिवसांत अहवाल द्या...

विनयभंग : हॉटेल व्यवस्थापकाला अटक

जुने गोवे येथील १० वर्षांच्या मुलीला बिर्याणीचे पार्सल देण्यासाठी घरी येऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी रेस्टॉरंटचा व्यवस्थापक भास्कर याला अटक केली आहे.

त्याच्याविरुद्ध भादंसंच्या कलम ३५४ तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

या मुलीच्या पालकांचे संशयिताच्या रेस्टॉरंटमध्ये येणे-जाणे होते. त्यामुळे त्या रेस्टॉरंटमधून अधूनमधून त्यांच्या घरी पार्सल मागवायचे. हे पार्सल घरी आणून देण्यासाठी संशयित येत असे आणि अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून तिचा विनयभंग करायचा.

Goa Crime News
Goa Monsoon 2023: राज्‍यभरात पावसाचे थैमान; झाडे, दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

त्याच्या या कृत्याला कंटाळून त्या रेस्टॉरंटमधील बिर्याणी आवडत नसल्याचे मुलीने सांगितले. तिने ही बिर्याणी का नको, याबद्दल काहीच सांगितले नाही. मात्र, बिर्याणी नको, एवढेच ती सांगत होती. घडलेला प्रकार सांगण्याच्या मन:स्थितीत ती नव्हती. तिच्या या वागणुकीमुळे पालकांना संशय आला.

आईने मुलीला वारंवार विचारल्यानंतर संशयिताने आक्षेपार्ह भागांना स्पर्श केल्याचे मुलीने सांगितले. या माहितीने पालक हादरून गेले. मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पालकांनी संशयिताविरुद्ध जुने गोवे पोलिसांत तक्रार दाखल केली.

पालक व शिक्षकांनी मुलांना चांगला व वाईट स्पर्श याबाबत त्यांना विश्‍वासात घेऊन माहिती देण्याची गरज आहे, असे मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com