Goa Crime: भाड्याच्या खोलीत आढळले बाप-लेकाचे संशयास्‍पद मृतदेह; आईची मृत्यूशी झुंज, करासवाडा-म्‍हापसा येथील घटना

Karaswada Mapusa Crime: इंदिरानगर, करासवाडा-म्हापसा येथे भाड्याच्या खोलीत एकाच कुटुंबातील बाप-लेकाचा मृतदेह संशयास्पद स्‍थितीत आढळून आल्‍याने खळबळ उडाली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: इंदिरानगर, करासवाडा-म्हापसा येथे भाड्याच्या खोलीत एकाच कुटुंबातील बाप-लेकाचा मृतदेह संशयास्पद स्‍थितीत आढळून आल्‍याने खळबळ उडाली आहे. दरम्‍यान, आई अत्‍यवस्‍थ असून तिच्‍यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

अजय जाधव (३८) आणि त्यांचा मुलगा अथर्व जाधव (७) हे दोघे मृतावस्‍थेत सापडले. तर अथर्व याची आई सुवर्णा जाधव (३०) यांची प्रकृती चिंताजनक आहे. या तिघांनी विषारी द्रव्‍य प्राशन केले असावे, असा संशय आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Goa Crime
Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मिळालेल्‍या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली-सावंतवाडी येथील मूळ रहिवासी असलेले हे जाधव कुटुंब गेल्या वर्षभरापासून इंदिरानगर-करासवाडा येथे एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते.

अजय जाधव हे पणजीत एका खासगी बँकेत कामाला होते. त्‍यांची पत्‍नी सुवर्णा या गृहिणी असून अथर्व स्थानिक शाळेत शिक्षण घेत होता. आज शनिवारी दुपारी बाराच्‍या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

घटनेपूर्वी काल शुक्रवारी रात्री अजय यांनी आपल्या वडिलांना सोनुर्ली येथे फोन करून, ‘मुलगा आणि पत्नी झोपत नाहीत’ अशी माहिती दिली होती. त्यावर वडिलांनी त्यांना देवाचा अंगारा लावण्याचा सल्ला दिला होता.

त्यानंतर शनिवारी सकाळपासून अजय यांच्याशी संपर्क साधण्याचा वडिलांनी अनेकदा प्रयत्न केला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्‍याने अजय यांचे वडील तातडीने बसने गोव्यात करासवाडा येथे आले. खोलीत पोहोचल्यावर त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केले.

रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्यानंतर अजय आणि अथर्व या दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, सुवर्णा जाधव यांची नाडी सुरू असल्याचे आढळले. त्‍यामुळे त्यांना तत्काळ गोमेकॉत दाखल करण्यात आले.

Goa Crime
Goa Water Metro: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लवकरच धावणार वॉटर मेट्रो, प्रवास होणार अधिक सोयीस्कर

कशी उघडकीस आली घटना?

काल शुक्रवारी रात्री अजय यांनी आपल्‍या वडिलांना सोनुर्ली येथे फोन करून ‘पत्नी व मुलगा झोपत नाहीत’ अशी माहिती दिली. आज शनिवारी सकाळपासून वडिलांच्‍या फोनला प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यामुळे त्‍यांनी सोनुर्लीहून थेट करासवाडा गाठले आणि हा प्रकार उघडकीस आला.

झाला होता प्रेमविवाह

अजय व सुवर्णा यांचा प्रेमविवाह झाला होता. अजय लग्नापूर्वीपासूनच बरीच वर्षे कामानिमित्त गोव्यात वास्तव्याला होते. हे कुटुंब शेजाऱ्यांशी फारसे मिसळत नसे. दाम्पत्यामध्ये कधी वादविवाद होताना पाहिले किंवा ऐकले नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले.

पडले होते निपचित

अजयच्‍या वडिलांनी खोलीचा दरवाजा जोराने ढकलून आत डोकावून पाहिले असता अजय, सुवर्णा आणि अथर्व हे तिघेही जमिनीवर निपचित पडलेले आढळले. त्यांपैकी केवळ सुवर्णाची नाडी सुरू असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. तिला रुग्‍णालयात हलविले.

नातेवाईकांचे जबाब नोंद : पोलिसांनी ‘अनैसर्गिक मृत्यू’ म्हणून नोंद केली असून जाधव कुटुंबातील काही नातेवाईकांचे जबाबही नोंदविले आहेत. उद्या दोन्ही मृतदेहांचे विच्छेदन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com