सासष्‍टीच्‍या सबरजिस्ट्रार विरोधात दक्षिण गोवा वकील संघटनेची तक्रार

मुख्‍य रजिस्‍ट्रार यांच्याकडे मांडली समस्या
Salcete Sub Registrar:
Salcete Sub Registrar: Dainik Gomantak

Salcete Sub Registrar: सासष्‍टीचे सब रजिस्ट्रार तुशान कुंकळयेकर यांच्‍यासमोर नोंदीसाठी आलेल्‍या डिडस्‌ दहा-दहा दिवस पडून राहतात.

त्‍यामुळे नागरिकांच्या कामाचा खोळंबा होतो आणि शिवाय तत्काळ कामे करून घेण्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यावरून रजिस्ट्रार कुंकळयेकर यांच्याविरोधात तक्रार दाकल करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा वकील संघटनेच्‍यावतीने मुख्‍य रजिस्‍ट्रार पराग नगर्सेकर यांच्‍याकडे ही तक्रार करण्‍यात आली आहे.

Salcete Sub Registrar:
Goa Cyber Crime: गोव्यातील मुलीची 8.50 लाख रूपयांची फसवणूक; आधी ऑनलाईन फ्रेंडशिप, मग लग्नाचे आमिष...

दिवसेंदिवस डिड्स पडून राहिल्याने नागरिकांना आपली कामे त्‍वरित करुन घेण्‍यासाठी तत्‍काळ आणि सुपर तत्‍काळ सेवांचा अवलंब करुन घ्‍यावा लागतो. त्यासाठी विनाकारण दहा हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचा भुर्दंड पडतो, असे तक्रारीत म्हटले आहे.

सासष्‍टीसाठी दाेन सबरजिस्‍ट्रारांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली असून त्‍यापैकी एक सूरज वेर्णेकर हे असून दुसरे तुशान कुंकळयेकर हे आहेत. वेर्णेकर यांच्‍यासमोर नोंद करण्‍यासाठी ज्‍या डिडस्‌ दाखल होतात त्‍या एक ते दोन दिवसात निकाली काढल्‍या जातात.

मात्र कुंकळयेकर यांच्‍यासमोर आलेल्‍या डिडस्‌ दहा दिवसांपेक्षा अधिक काळ पडून राहतात, याकडे लक्ष वेधून यासंबंधी मुख्‍य रजिस्‍ट्रारांनी याेग्‍य ती चाैकशी करुन पक्षकारांना या त्रासातून सोडवावे, अशी मागणी केली आहे.

Salcete Sub Registrar:
Goa Gold Smuggling: गोवा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राज्यातील विमानतळांवरील सोने तस्करीत हात

सर्वसाधारण मार्गाने आपले काम होत नसल्‍याने पक्षकारांना विनाकारण तत्‍काळ किंवा सुपर तत्‍काळ सुविधेचा लाभ घ्‍यावा लागतो. यासाठी त्‍यांना दहा ते पन्नास हजार रुपये अतिरिक्‍त खर्च करावे लागतात. त्‍यामुळे पक्षकार त्रस्‍त झाले आहेत.

आणि वकिलांनाही याचा त्रास होतो, असे दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्‍यक्ष ॲड. प्रसाद नाईक यांनी दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com